25.6 C
Latur
Monday, July 8, 2024
Homeलातूरअनुदान न मिळाल्याने शेतक-यांत नाराजी

अनुदान न मिळाल्याने शेतक-यांत नाराजी

रेणापूर :  प्रतिनिधी
रेणापूर  तालुका हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला असुन  दुष्काळ अनुदान यादी प्रमाणे केवायसी करण्यात आली आहे. केवायसी करून  अनेक महिने लोटले तरी बहुतांश  शेतक-यांंचे  अनुदान अद्याप मिळाले नाही. यासह अन्य मागण्यांचे निवेदन तालुका कॉग्रेस व शेतक-यांच्या वतीने रेणापूरच्या तहसिलदार मंजुषा भगत यांना शुक्रवारी  दि. ५ रोजी  देण्यात आले.
          रेणापूर तालुका हा दुष्काळ ग्रस्त तालुका म्हणून जाहिर झाला आहे . मात्र दुष्काळ अनुदान यादी प्रमाणे केवायसी करण्यात आले  आहे.  अनेक  महिने लोटले तरी बहुतांश शेतक-यांचे अनुदान अद्यापपर्यंत जमा झाले नाही तसेच पी. एम. किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतक-यांंना वार्षिक ६ हजार  व राज्य शासनाचे अनुदान ६ हजार असे वार्षिक अनुदान १२ हजार जाहीर केले आहे ते अनुदानही तालुक्यातील कांही शेतक-यांंच्या खात्यावर जमा झालेले नाही. त्याच बरोबर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली नुकसान भरपाई शेतक-यांंना वेळेवर मिळत नसल्याने तालुक्यातील बळीराजा आर्थिक  संकटात सापडला आहे.
    तेव्हा  रेणापुर  तालुक्यातील शेतक-यांंना, दुष्काळी अनुदान तसेच इतर अनूदान मिळण्यासाठी आपल्या  स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करून  तालुक्यातील शेतक-यांंना  न्याय द्यावा. गेल्या  हंगामातील मंजुर झालेला पिक विमा तसेच शासनाने जाहिर केलेले सर्व अनुदान  शेतक-यांंच्या खात्यावर तात्काळ  जमा करावे. या मागण्यासंदर्भात कार्यवाही न झाल्यास रेणापूर  तालुका कॉग्रेस पक्ष  व शेतक-यांंना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आला आहे .
या निवेदनावर रेणापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंग्रे, उपसभापती अ‍ॅड शेषेराव हाके, पं स .माजी सभापती शिवराज सप्ताळ, कृउबाचे संचालक जनार्धन माने, प्रमोद कापसे, विश्वनाथ कागले, संजय देशमुख, सुदर्शन चित्ते, तानाजी चव्हाण, विठ्ठल देवकते, सचिन इगे, मंगेश बोळंगे, सतीश चव्हाण, शाम सुर्यवंशी यांच्यासह कॉग्रेसचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR