लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सरकारने अनुसूचित जाती जमाती विभागाचा निधी अन्य विभागांना वळवू नये तसेच याबाबत कायदा करण्यात यावा, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती जमाती विभाकडून निवेदनाद्वारे लातूर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य सत्कारकडे करण्यात आली आहे.
राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील अनुसूचित जाती जमाती तसेच मागासवर्गीय विविध दुर्बल घटकांच्या शिक्षण, सामाजीक प्रगती यासाठी निधीची घोषणा करण्यात आली. यामध्ये समाजकल्याण विभागाच्या करिता ४२५ कोटी आणि आदिवासी विभागासाठी ३४० कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली असताना सदरील निधी अन्य विभागांना वळविण्यात आला आहे. ज्यामुळे अनुसूचित जाती जमाती सर्वांगीण विकासासाठी निधी उपलब्ध नसल्याने अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात अडचणी येत आहेत.
या सर्व बाबीचा विचार करता सरकारने अनुसूचित जाती जमाती विभागाचा निधी अन्य विभागांना वळवू नये तसेच या संदर्भात कायदा करण्यात यावा, अशी मागणी लातूर शहर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती जमाती विभाग यांच्या कडून करण्यात आली आहे. या बाबतचे लेखी निवेदन लातूर जिल्हाधिकारी याना सादर करण्यात आले आहे.
यावेळी प्रदेश पदाधिकारी गोरोबा लोखंडे, माजी उप महापौर कैलास कांबळे, भटक्या विमुक्त विभाग नेते प्रा.सुधीर अनवले, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण कांबळे, असिफ बागवान, नागसेन कामेगावकर, संजय ओव्हाळ, भालचंद्र सोनकांबळे, अॅड.अंगद गायकवाड, शेख अब्दुल्ला, विजय टाकेकर, राजू गवळी, बिभीषण सांगवीकर, संदीपान सूर्यवंशी, अॅड. गणेश कांबळे, नितीन कांबळे, करीम तांबोळी, पवन गायकवाड, चंद्रकांत मगर, नितीन मगर, सुधाताई कांबळे, संभाजी कांबळे, अशोक सूर्यवंशी यांच्यासह लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.