शरुर अनंतपाळ : शकील देशमुख
मागील आठवडा भरापासून मान्सुनपूर्व अवकाळी पावसाने शिरूर अनंतपाळ तालुक्यात कहर सुरू केला आहे. मागील सात दिवसांत झालेल्या अवकाळी पावसात वीज पडून तालुक्यात तीन जनावरे दगावली.यत १६० एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे तर वादळी वा-याने अनेकांची कुटूंब उघड्यावर आले असून गोठ्याचे नुकसान झाल्याने जनावरे उघड्यावर तर शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा मे महिन्यात अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. त्यात प्रादेशिक हवामान केंद्राकडून शेतक-यांना पाऊस व वादळाच्या सूचना ही देण्यात आल्या.अशात मागील आठवडा भरापासून तालुक्यात अवकाळी पावसासह वादळी वा-याने धुमाकुळ घातला असून या अवकाळी पावसाने तालुक्यातील अनेक गावांना तडाखा दिला आहे. दरम्यान तालुक्यात दोन दिवसापासून वादळी वा-यासह विजेचा कडकडाट होत असून तीन ठिकाणी पशुधन दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. वीज पडून तीन जनावरे दगावली असून वादळामुळे अनेक जनावरे जखमी देखील झाले आहेत.
यात साकोळ येथील माधव जांभळे यांची गाय गाय, संतोष बोने यांचे गाईचे वासरु तर येरोळ येथील एक बैल विज पडून पडून दगावले तर महेश लुल्ले यांच्या कॅम्प चे नुकसान झाले आहे.तसेच मंगळवारी झालेल्या वादळी वा-यात उजेड येथील बिलाल मस्तानअली सय्यद यांच्या शेतातील जनावरांचा शेड उखडून पडल्याने त्यातील पंचेवीस जनावरे उघड्यावर आली असून त्यात जनावरांचा चारा भिजल्याने या तरूण शेतक-याचे मोठे नुकसान झाले आहे.यासह घरांवरील पत्रे उडाल्याने अनेकांचे कुटूंबे उघड्यावर पडली आहेत. तर या अवकाळी पावसाच्या तडाख्याने तालुक्यातील १६० एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.यात भाजीपाला व कोथिंबीर पिकांचा समावेश आहे. मागील सात दिवसांच्या पावसाने शेतकरी संकटात सापडला आहे.