सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे विजयी झाले असून त्यांनी भाजपच्या संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीच्या चंद्रहार पाटील यांचा पराभव केला आहे. विशाल पाटील हे सुरुवातीपासून आघाडीवर होते, त्यांनी शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवत सांगली आपलीच असल्याचा संदेश दिला.