18.9 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeमहाराष्ट्रअफवा पसरवणा-यांवर गुन्हा दाखल करणार

अफवा पसरवणा-यांवर गुन्हा दाखल करणार

जनतेने अफवांना बळी पडू नये, ग्रामस्थांचे प्रबोधन करणार
सोलापूर : प्रतिनिधी
निवडणुका घेण्याचे अधिकार फक्त निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक कार्यालयाला आहेत. मार्कडवाडीत होत असलेला प्रकार बेकायदा आहे. याबाबत आम्ही मारकडवाडीतील जनतेमध्ये प्रबोधन करणार आहोत. तसेच ज्यांनी बेकायदा पद्धतीने मतदान करून घेण्याचा प्रयत्न केला अशा ८९ जणावर गुन्हे दाखल केले आहेत. जनतेने अफवांना बळी पडू नये. तसेच अफवा पसरण्यांवर गुन्हा दाखल करणार आहोत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

मारकडवाडी प्रकरणाबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली, तेव्हा ते बोलत होते. यावेळी त्यांनी मतदान यंत्रे सोलापुरात रामवाडी गोदामात आल्यापासून ते मतमोजणी पूर्ण होईपर्यंत केलेल्या सर्व प्रक्रियांची माहिती दिली. संपूर्ण प्रक्रियेत राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. तेव्हा कोणी कुठल्याही टप्प्यात, कसलेही आक्षेप घेतले नाहीत. तशा त्यांच्या स्वाक्ष-याही आहेत. त्यामुळे सध्या जो प्रकार चालू आहे, तो चुकीचा आहे, बेकायदा आहे, असे आशीर्वाद यांनी सांगितले.

सध्या चालू असलेल्या अफवांविरोधात आम्ही मारकडवाडीमधील जनतेमध्ये जागृती करणार आहोत. जनतेनेही या अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. मारकडवाडीत बेकायदापणे मतदान घेण्याचा प्रयत्न करणा-या ८९ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे आशीर्वाद यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR