लातूर : प्रतिनिधी
मनपा आयुक्त, देविदास जाधव, व उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांच्या मार्गदर्शनानुसार डेंग्यु ताप प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अनुषंगाने लातूर शहर महानगरपालिकेमार्फत दि. ५ मे ते १७ या कालावधी मध्ये संपूर्ण शहरात अबेट मोहीमेचा पहिला राउंड राबविण्यात येत आहे. शहरातील एकूण अपेक्षीत घरसंख्या ७७ हजार ५९७ आहे. या सर्व घरामध्ये कंटेनर तपासणी करुन डास अळी आढळून आलेल्या कंटेनर मध्ये अॅबेट टाकण्यात येणार आहे व आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे.
डेंग्यु हा आजार एडिस एजिप्ताय या डासाच्या मादीच्या चावण्यामुळे होते, या डासाची उत्पती रांजण, हौद, पाण्याच्या टाक्या, कुलर्स, कारंजे, फलदाण्या इ. ठिकाणच्या स्वच्छ पाण्यात होते. घराभोवतालच्यां परिसरात अडगळीच्या वस्तुमध्ये विशेषत: जुन्या टायर्समध्ये साठवलेल्या तसेच सध्या मो्या प्रमाणात कुलरचा वापर होत असून कुलरच्या साठवलेल्या पाण्यात हे डास वाढतात.