24.5 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeमुख्य बातम्याअब्जाधिशांच्या पंक्तीत भारताला मानाचे पान!

अब्जाधिशांच्या पंक्तीत भारताला मानाचे पान!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतातील अब्जाधीशांच्या संपत्तीत एका वर्षात तब्बल ४२ टक्क्यांची वाढ झाली. अमेरिका आणि चीननंतर भारतात १८५ अब्जाधीशांची संख्या झाली आहे. अब्जाधीशांच्या संख्येत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागत असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे.

एकीकडे भारतात रोजगाराचे संकट आहे आणि डॉलरच्या तुलनेत रुपया सातत्याने कमकुवत होत आहे. महागाईमुळे लोकांच्या खिशाला झळ बसत आहे. मात्र, दुस-या बाजुला अब्जाधीशांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे.

रेटिंग एजन्सी ‘युबीएस’च्या नवीनतम अब्जाधीश महत्वाकांक्षा अहवालात असे दिसून आले आहे की एका वर्षात भारतातील अब्जाधीशांच्या संपत्तीत ४२.१ टक्क्यांनी वाढ झाली. अमेरिकेत अब्जाधीशांची संख्या ८३५ तर चीनमध्ये ४२७ आहे. एवढेच नाही तर भारतात दर तीन महिन्यांनी एक नवा अब्जाधीश होत आहे. भारतात एका वर्षात ३२ नवीन अब्जाधीशांची भर पडली आहे.

‘युबीएस’ अहवालात दिलेल्या माहितीनुसार, भारताचे पुढील दशक अब्जाधीशांचे असणार आहे. या काळात अब्जाधीशांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल. भारतात १०८ सार्वजनिकरित्या सूचीबद्ध कौटुंबिक व्यवसाय आहेत, ज्यांनी अब्जाधीशांच्या संख्येत भारताला तिस-या स्थानावर नेले आहे. जलद शहरीकरण, डिजिटलायझेशन, उत्पादन क्षेत्राचा विस्तार आणि ऊर्जा क्षेत्र यामुळे हा वेग वाढत आहे. पुढील दशकात भारतातील अब्जाधीशांची संख्या चीनच्या बरोबरीने असेल असा अंदाज आहे. दिवसेंदिवस जगात अनेकांच्या संपत्तीत मोठी वाढ होताना दिसत आहे. यामुळे जगातील अब्जाधिशांची संख्या देखील झपाट्याने वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR