नागपूर : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सोनू सूदच्या पत्नीबाबत मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनालीचा भीषण अपघात झाला आहे. मुंबई-नागपूर महामार्गावर सोनाली सूदचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सोनाली सूद जखमी झाली आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला ते अजूनही समजू शकलेले नाही. सोनाली सूदवर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अभिनेता सोनू सूदची पत्नी आपल्या कुटुंबासोबत मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून प्रवास करत होती. दरम्यान हा प्रवास करत असताना तिच्या गाडीला अपघात झाल्याचे समोर येत आहे. यामध्ये ती जखमी झाली आहे.
दरम्यान तिच्यावर नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अभिनेता सोनू सूद तातडीने नागपूरकडे रवाना झाला आहे.
सोनू सूदने १९९६ मध्ये सोनालीशी लग्न केले. सोनाली सूद ही मूळ आंध्र प्रदेशमधील रहिवासी आहे. सोनू सूद आणि सोनाली सूद यांना दोन अपत्यं आहेत. ती देखील एक प्रसिद्ध चित्रपटनिर्माती आहे.