मुंबई : वृत्तसंस्था
कतरिना लवकरच आई होणार आहे. विकी आणि कतरिना या दोघांनी ही गोड बातमी चाहत्यांना सोशल मीडियावर शेअर केली आहे. यावेळी शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ते म्हणतात, आम्ही आमच्या आयुष्यातील सगळ्यात बेस्ट चॅप्टर सुरू करण्याच्या मार्गावर. आमचे आयुष्य आनंद आणि कृतज्ञतेने भरून गेले आहे.
पुढील महिन्यात कतरिना बाळाला जन्म देणार असल्याचे बोलले जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका इव्हेंटमध्ये विकीने एकट्याने हजेरी लावली तेव्हाच चाहत्यांनी या जोडीच्या आयुष्यात छोटा पाहुणा येणार असल्याचे अंदाज बांधायला सुरुवात केली होती. आता या पोस्टने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. कतरिना सध्या शेवटच्या तिमाहीत असून बराच काळ कॅमे-यापासून लांब आहे.
कतरिनाने गेल्या दोन वर्षांत कोणताही नवीन सिनेमा साईन केला नसून बाळाच्या जन्मांनंतरही ती बराच मोठा मॅटिर्निटी ब्रेक घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे लाडक्या कॅटला पडद्यावर पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांना बराच काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
लंडनमध्ये होणार डिलिव्हरी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कतरिना लंडनमध्ये बाळाला जन्म देणार असल्याचे बोलले जात आहे. काही काळापूर्वी या जोडीला लंडनमध्ये एकत्र फिरताना पाहिले होते. त्यावेळी अनेकांनी कतरिनाचे बेबी बम्प दिसत असल्याचे सांगितले होते.
अभिनंदनाचा वर्षाव
या जोडीने गोड बातमी जाहीर करताच त्यांच्यावर बॉलिवूडसहित फॅन्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. यामध्ये सोनम कपूर, रेणुका शहाणे, अक्षया नाईक, सागरिका घाटगे यांचा समावेश आहे.