24.2 C
Latur
Friday, September 5, 2025
Homeमनोरंजनअभिनेत्री गौहर खान दुस-यांदा बनली आई

अभिनेत्री गौहर खान दुस-यांदा बनली आई

मुंबई : वत्तसंस्था
बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान आणि झैद दरबार यांनी चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. दोघांनीही आपल्या दुस-या बाळाला जन्म दिला आहे. इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करुन दोघांनी चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर केली. आपल्या पोस्टमध्ये मोठा मुलगा जेहानला आता लहान भाऊ मिळाल्यामुळे खूप आनंद झाला आहे.

बुधवारी या जोडप्याने इंस्टाग्रामवर एक अधिकृत पोस्ट शेअर करुन चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. गौहर खानला पहिला मुलगा आहे, त्याचे नाव जेहान आहे. गौहर खानने इंस्टाग्रामवर पोस्ट करून तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी आनंदाची बातमी शेअर केली. गौहर खान दुस-यांदा आई झाली असून तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

गौहर खानची इन्स्टा पोस्ट
गौहर खाननं इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये लिहिलंय की, जेहानच्या आनंदाला सीमा नाही. जेहानला भाऊ मिळाला आहे. गौहर खानची प्रसूती १ सप्टेंबर रोजी झाली. तिनं सर्वांनी दिलेलं प्रेम आणि आशीर्वादासाठी आभार मानले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR