23.3 C
Latur
Sunday, January 26, 2025
Homeमहाराष्ट्रअमरावतीत संघटनांकडून त्रिशूळचे वाटप; काँग्रेसचा आरोप

अमरावतीत संघटनांकडून त्रिशूळचे वाटप; काँग्रेसचा आरोप

अमरावती : प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यात काही संघटना त्रिशूळ वाटत आहेत. मात्र हा त्रिशूळ नसून ही गुप्ती आहे. दरम्यान भविष्यात एखादी घटना घडली आणि त्याला हिंसक वळण लागले तर याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, असा आरोप करत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यासह राज्याला याने हिंसक वळण लागेल, अशी भीती व्यक्त केली आहे.

दरम्यान, यशोमती ठाकूर यांनी केलेल्या आरोपांना भाजप खासदार अनिल बोंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी अनिल बोंडे म्हणाले की, हे दुर्दैव आहे की यशोमती ताईंनी गांधारीसारखी डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे. यांना मुसलमानांच्या घरातले सत्तूर आणि कोयते दिसत नाहीत का? धार्मिक विधी म्हणून कोणी त्रिशूळ वाटत असेल तर खरोखर द्यायला पहिजे. हिंदूंच्या घरात साप मारायला साधी काठी नसते. त्यामुळे स्व रक्षणासाठी जर घरात त्रिशूळ असेल तर ते आवश्यक असल्याचा शेराही भाजप खासदार अनिल बोंडे यांनी यावेळी दिला आहे.

अमरावती जिल्ह्यात काही संघटना त्रिशूळ वाटत आहेत. मात्र हे त्रिशूळ नसून ही गुप्ती आहे. या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. आम्ही याची तक्रार पोलिसांत अद्याप केली नाही, पण पोलिसांनी सुमोटो दाखल केले पाहिजे. यावेळी बोलताना यशोमती ठाकूर यांनी त्रिशूळसारख्या दिसणा-या शस्त्राचे फोटोही दाखवले आहेत.

आम्ही उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याबाबत याचिका दाखल केली आहे. लोकशाहीला मारण्यासाठी हे सगळे काम सुरू आहे. आम्हाला तुमची साथ हवी आहे, असे आवाहनही यावेळी ठाकूर यांनी केले आहे.

तर महादेवाच्या मंदिरावर गुन्हे दाखल करा- अनिल बोंडे
राजकारणासाठी एवढे लांगुलचालन करायचे की अल्पसंख्याक लोकांमध्ये भीती निर्माण करायची. एखाद्याजवळ त्रिशूळ सापडले तर यशोमती ठाकूर यांनी सांगावे. दरम्यान कुठे त्रिशूळ दिसले किंवा मंदिरात त्रिशूळ गाडलेले दिसले तर शंकर मंदिरावर गुन्हे दाखल करा, असे पोलिसांना सांगावे, असा मिश्किल टोलाही खासदार अनिल बोंडे यांनी लगावला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR