22.8 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeमहाराष्ट्रअमरावती, भिवंडीत एनआयएचा छापा

अमरावती, भिवंडीत एनआयएचा छापा

पाकिस्तानच्या संपर्कात असलेल्या तरुण ताब्यात

अमरावती : प्रतिनिधी
एनआयएच्या टीमने अमरावती शहरासह १७ ठिकाणी छापे टाकले असून अनेकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे . अमरावती शहरातील छाया नगर मधून एनआयएने ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव मुसाईद असून त्याचे वय २७ वर्ष आहे. या युवकावर अमरावती शहरात विनयभंगचा गुन्हा देखील दाखल झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, अमरावती शहरातील छाया नगर परिसरातून एनआयच्या टीमने एका २७ वर्षे युवकाला रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे . मिळालेल्या माहितीनुसार हा युवक पाकिस्तान मधील एका संघटनेच्या संपर्कात असल्याचा समोर आले आहे . हा तरुण गेल्या सहा महिन्यांपासून पाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे . अनेक वेळा या तरुणाला पाकिस्तान मधून फोन आल्याचं प्राथमिक सूत्रांनी सांगितले आहे .

एनआयए कडून १७ ठिकाणी छापे
अमरावती शहरासह एनआयए कडून १७ ठिकाणी छापे मारले आहेत . यातून अनेकांना ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. भिवंडी शहरालगतच्या खोणी खाडीपार ग्रामपंचायत परिसरात पहाटेच्या सुमारास आलेल्या पथकाने एकास घेतले ताब्यात आहे. कामरान अन्सारी ४५ असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. पाकिस्तानमध्ये देशविरोधी संघटनेशी संपर्क असल्याचा संशय असल्यानं ही कारवाई करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR