30.5 C
Latur
Saturday, May 31, 2025
Homeमहाराष्ट्रअमरावती शहरात सहा दिवस वीजपुरवठा बंद!

अमरावती शहरात सहा दिवस वीजपुरवठा बंद!

अमरावती : वादळामुळे प्रभावित झालेली वीज यंत्रणा तसेच पावसाळा लक्षात घेता देखभाल, दुरुस्तीची कामे २९ मे ते ३ जूनपर्यंत केली जाणार आहेत. फीडरनिहाय ती कामे करण्यात येणार असल्याने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत संबंधित भागातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय सराटे यांनी केले आहे.

गुरुवारी ११ केव्ही श्रीकृष्णपेठ फिडरवरील देखभाल दुरुस्ती करण्यात येणार असल्याने या फीडरवरून वीजपुरवठा होणा-या श्रीकृष्णपेठ, इर्विन चौक येथील काही भाग, शिवाजी सायन्स कॉलेज, तहसील, देवराव गॅरेज या भागाचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. ३० मे रोजी ११ केव्ही चौधरी चौक फीडरवरील वॉलकट कम्पाऊंड, कॉटन मार्केट रोड, एपीएमसी, बच्छराज प्लॉट, चौधरी चौक, सिंधी चौक, राम-लक्ष्मण संकुल या भागाची दुरुस्ती होणार आहे. ३१ मे रोजी ११ केव्ही एच.टी. फीडरवरील डफरीन, सुपर स्पेशालिटी, शासकीय तंत्रनिकेतन, जिल्हा क्रीडालय,

सांस्कृतिक भवन परिसरात वीज बंद राहील. १ जून रोजी ११ केव्ही रेल्वे स्टेशन फीडरवरील कामे करण्यात येणार असल्याने जिल्हा रुग्णालय, खापर्डे बगिचा, समाधाननगर, होली क्रॉस, रेल्वे स्टेशन रोड, बसस्थानक, काझी कम्पाऊंड, बसस्टँड रोड या भागाचा वीजपुरवठा बंद राहील. २ जूनला ११ केव्ही एल.आय.सी. फीडर दुरुस्तीमुळे अशोकनगर, एलआयसी ऑफिस, गौतमनगर, रामपुरी कॅम्प, भीमनगर, सिद्धार्थनगर, सिव्हिल लाईन या भागाचा, वीजपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती महावितरणने दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR