लातूर : प्रतिनिधी
काँग्रेस महाविकास आघाडीचे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचा कार्यअहवाल लातूर सिटी रिपोर्ट कार्डचे काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते ऑनलाईन विमोचन दि. १३ नोव्हेंबर रोजी शहरातील दयानंद शिक्षण संस्थेच्या प्रांगणावर महाविकास आघाडीच्या विराट प्रचार सभेत झाले.
या सभेत लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचा कार्य अहवाल लातूर रिपोर्ट कार्डचे ऑनलाईन विमोचन करण्यात आले. गेल्या पाच वर्षात २४०० कोटींची विकासकामे करण्यात आली आहेत. या सर्व कामाचा आढावा मांडणारे लातूर सिटी रिपोर्ट कार्डचे विमाचन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते करण्यात आहे.
यावेळी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, तेलंगणाचे सिंचन मंत्री उत्तमकुमार रेड्डी, खासदार डॉ. शिवाजी काळगे, कुणाल चौधरी, आमदार राजेश राठोड, लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज विलासराव देशमुख, उदगीरचे उमेदवार सुधाकर भालेराव, औशाचे उमदेवार दिनकर माने, निलंग्याचे उमेदवार अभय साळुंखे, माजी खासदार सुधाकर शृंगारे, वैजनाथ शिंदे, श्रीशैल उटगे, संतोष सोमवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष संजय शेटे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी शेतकरी कामगार पक्षाचे नेते उदय गवारे लातूर लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी महापौर दीपक सूळ, मोईज शेख, संतोष सोमवंशी, अॅड. फारुक शेख, आदिसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पार्टी, शेतकरी कामगार पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खरगे यांना संविधानाची प्रत भेट
काँग्रेस महाविकास आघाडीच्या लातूर जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवारी येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या प्रांगणात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या प्रमुख उपस्थित विराट प्रचार सभा झाली. या सभेत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी खरगे यांना संविधानाची प्रत भेट दिली. यावेळी माजी खासदार सुधाकर शृंगारे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, लक्ष्मण कांबळे, मोहन माने, गोरोबा लोखंडे, प्रा. प्रविण कांबळे, अॅड. बाबासाहेब गायकवाड, प्रविण सूर्यवंशी, प्रा. सुधीर अनवले, राजकुमार होळीकर, आतिश चिकटे यांनी संविधानाची प्रत खरगे यांना भेट दिली.