लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमित विलासराव देशमुख यांनी जनसंपर्क अभियाना अंतर्गत दि. १३ नोव्हेंबर रोजी सांयकाळी लातूर शहरातील प्रभाग १३, १४, १५ व येथून भव्य प्रचार रॅली काढली या रॅलीला मतदारांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.पुरुष महिला, युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक मोठया प्रमाणात या रॅलीत सहभागी झाले होते. ठिकठिकाणी नागरिकाकडून फटाक्याची आतषबाजी आणि पुष्पवृ्ष्टी करण्यात आली. महिलांनी औक्षण करून रांगोळी काढून स्वागत
केले.
सांयकाळी ६ वाजता लातूर शहरातील प्रभाग १३ मधील संविधान चौक येथून लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रचार रॅलीला प्रारंभ झाला. रॅलीच्या प्रारंभीच हजारोंच्या संख्येत नागरिक तिरंगी व महाविकास आघाडीचे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमित विलासराव देशमुख यांच्या रॅलीची सुरुवात होताच काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या घोषणांनी परीसर दुमदूमून गेला. रॅली मार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांनी रांगोळी काढून मार्ग सुशोभित केला होता.
अनेक घरांच्या छतावरुन रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली, हातात फलक, झेंडे घेऊन मोठया संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते नागरीक सहभागी झाले होते.ही भव्य रॅली प्रभाग १३ मधील संविधान चौक पासून ते खाडगाव रोड हिप्परकर कॉम्पलेक्स तर प्रभाग क्र. १४ मधील गणेश चौक ते महसुल कॉलनी- जुना औसा रोड श्रीराम चौक दादाजी कोंडदेव नगर- केदारनाथ शाळेपर्यंत तर प्रभाग क्र.१५ मधील लगसकर बिल्डींग ते देशमुख हॉस्पिटल आदर्श कॉलनी कमान कम्युनिटी हॉल- नारायण नगर – सिताराम चौक अष्टविनायक मंदीर- शिवनगर-ठाकरे चौक तर प्रभाग क्र. ९ मधील ठाकरे चौक ते मिनी मार्केट कामदार रोड बसवेश्वर कॉलेज – महानगर पालिकाच्या मागील बाजुने- विलासराव देशमुख पार्क- शिवनेरी गेट येथे सदरील रॅलीचा समारोप करण्यात आला.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी महापौर दीपक सूळ, सूर्यकांत कातळे, पप्पू देशमुख, नागसेन कामेगावकर, अॅड. विजय गायकवाड, दाा सोमवंशी, प्रा. डॉद्य शिवाजीराव जवळगेकर, सय्यद अली इनामदार, रविशंकर जाधव, गणेश एसआर देशमुख, शहाजी पाटील, पुनीत पाटील, धनंजय शेळके, यशवंत वाडीकर, सय्यद अली इनामदार, सय्यद मुक्रम, हुसेन शेख, पाशा शेख, धीरज केंद्रे, अशोक कातळे, आनंद वैरागे, किरण बनसोडे, सचिन पाटील, चांदपाशा इनामदार, हाजी जानी हसन, डॉ. रईस खान, शेख युनूस, अहेमद, रामदास पवार,सायराबानू पठाण, सुनील काळे, मिंिलद घनगावे, हुसेन शेख, मीना टेकाळे, अनिता कांबळे, मंदाकिनी शिखरे, वैभव शेळके, शोभा ओहळ आदीसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, महाविकास आघाडीचे माजी नगरसेवक पदाधिकारी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.