लातूर : प्रतिनिधी
शहरातील संविधान चौकात एका चार चाकीतून आलेल्या अनोळखी पत्रकाराने अमिर पठाण या तरुणास अवघड ठिकाणी मारहाण करून मारहाणीचे व्हीडोओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने सदरील तरूणाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न झाला असून त्याच्या व गुन्हतील चार चाकी गाडीचा अजून तरी एमआयडीसी पोलीसांना सुगावा लागलेला नसून त्यांचा शोध सुरुच असल्याचे पोलीसांकउून सांगण्यात येत आहे.
मागील आठवड्यात लातूरातील संविधान चौकात एका चार चाकीतून आलेल्या अनोळखी पत्रकाराने अमिर पठाण यास तु काश्मिरहून आलास का? पाकिस्तानचा आहेस का?, म्हणून त्याला अवघड ठिकाणी मारहाण करून मारहाणीचे व्हीडोओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने सदरील तरूणाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना या प्रकरणी मयताची पत्नी समरीन अमिर पठाण यांनी दिलेल्या जबाबावरून एमआयडीसी पोलीसांनी एम.एच. २४ बीआर ७००८ या गाडीतून निघून गेलेल्या अनोळखी पत्रकारा विरोधात गुन्हा दाखल करून अधिक तपासास सुरूवात केली होती.त्यानंतर एमआयडीसी पोलीसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत या दाखल गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न झाला असून लवकरच अटक केली जाईल असा दावा केला होता. पंरतु अजून तरी सदरील आरोपीचा व चार चाकी गाडीचा सुगावा पोलीसांना लागलेला नसून त्यांचाकडून आरोपीचा वगाडीचा शोध सुरूच असल्याचे सांगितले जात आहे.