29.3 C
Latur
Tuesday, May 6, 2025
Homeलातूरअमिर पठाण आत्महत्या प्रकरणी पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा

अमिर पठाण आत्महत्या प्रकरणी पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा

लातूर : प्रतिनिधी
येथील संविधान चौकात एका चार चाकीतून आलेल्या अनोळखी पत्रकाराने अमिर पठाण या तरुणास तु काश्मिरहून आलास का?, पाकिस्तानचा आहेस का ?, म्हणून त्याला अवघड ठिकाणी मारहाण करुन मारहाणीचे व्हीडोओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने सदरील तरुणाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना परवा घडली होती. या प्रकरणी आता एमआयडीसी पोलीसांनी अधिक तपासास सुरुवात केली असून मंगळवारी संविधान चौक येथील घटनास्थळाचा पोलीसांनी पंचनामा केल. यावेळी घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केल्याने काही वेळासाठी वाहतूक ही ठप्प झाली होती.
दोन दिवसा पुर्वी लातूरातील संविधान चौकात एका चार चाकीतून आलेल्या अनोळखी पत्रकाराने अमिर पठाण यास तु काश्मिरहून आलास का?, पाकिस्तानचा आहेस का ?, म्हणून त्याला अवघड ठिकाणी मारहाण करुन मारहाणीचे व्हीडोओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने सदरील तरुणाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना परवा रात्री ९ वाजनेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी मयताची पत्नी समरीन अमिर पठाण वय २९ वर्षे रा. ख्वॉजानगर खाडगावरोड लातूर यांनी दिलेल्या जबाबावरुन एमआयडीसी पोलीसांनी एम. एच. २४ बीआर ७००८ या गाडीतून निघून गेलेल्या अनोळखी पत्रकारा विरोधात गुन्हा दाखल करून अधिक तपासास सुरूवात केली आहे.
मंगळवारी दिवसभर पोलीसांकउून या घटनेचा तपास सुरु होता.  दुपारी पोलीसांनी संविधान चौकातील काही सीसी टिव्ही फुटेजची पडताळणी केल्याची ही माहीती असून सांयकाळी ६ वाजनेच्या सुमारास एमआयडीसी पोलीसांनी संविधान चौकात ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी शासकीय पंचा समक्ष घटनास्थळाचा पंचनामा
केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR