29.3 C
Latur
Tuesday, May 6, 2025
Homeलातूरअमिर पठाण यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणा-यावर कठोर कारवाई करा

अमिर पठाण यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणा-यावर कठोर कारवाई करा

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील अमिर पठाण या तरुणास अज्ञात व्यक्तीने संविधान चौक पाण्याची टाकीजवळ शुल्लक कारणावरुन मारहाण केली. धमकावण्यात आले, त्याचा धर्म विचारुन पाकीस्तानातून आला आहेस का असे म्हणून मानसीक छळ करण्यात आला. त्यामुळे अमिर पठाण याने राहत्या घरी आत्महत्या केली. अमिर पठाण यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणा-या अज्ञात व्यक्तीवर कठोर कार्यवाही करावी, या मागणीचे निवेदन लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना दि. ६ मे रोजी दिले.
अमिर पठाण यांच्या आत्महत्येप्रकरणी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करून त्यांच्याशी या गंभीर विषयाबाबत सविस्तर चर्चा केली आहे. अमीर पठाण यांच्या पत्नीने एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. त्यावरुन अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. या अज्ञात गुन्हेगाराने सोशल मीडियावर मारहान, शिवीगाळीचे फोटो तसेच व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी दिली. या कृत्यामुळे मानसीक तणाव घेऊन अमीर पठाण यांनी आत्महत्या केली आहे. तसेच पठाण यांचे कुटुंबीय सध्या प्रचंड दहशतीखाली व तणावाखाली असून ही घटना अत्यंत गंभीर असून त्यामुळे लातूर शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याची कल्पनाही लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना यावेळी दिली आहे.
 याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मोईज शेख, लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅङ. किरण जाधव, अ‍ॅड. फारुख शेख, इम्रान सय्यद, सुपर्ण जगताप, असिफ बागवान, प्रविण सुर्यवंशी, विष्णूदास धायगुडे, तबरेज तांबोळी, राहूल देशमुख, ख्वॉजापाशा शेख, कलीम तांबोळी आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR