मुंबई : आजकाल ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ओळखीचे असल्याचे भासवून अनोळखी नंबरवरून कॉल किंवा मेसेज करून अनेकांची फसवणूक केली जात आहे. अशाच एका फसवणुकीच्या प्रकारात अभिनेत्री अमिषा पटेलच्या नावाचा गैरवापर करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अमिषा पटेलला याबाबत माहिती मिळताच तिने पोस्ट शेअर करून जनतेला आवाहन केले आहे. सध्या अमिषाची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तिने पोस्ट शेअर करून चाहत्यांना सावध केले आहे.
काही लोकांना एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअॅप मेसेज आले होते. या नंबरच्या व्हॉट्सअॅप डीपीवर अमिषा पटेलचा फोटो होता. या फोटोवर तिने लाल ड्रेस परिधान केला होता. अमिषा पटेल असे सांगून या नंबरवरून अनेकांना मेसेज आला होता. अमिषा पटेलला कळताच तिने हा नंबर तिचा नसल्याचे स्पष्ट केले. अमिषाने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना हा नंबर ब्लॉक करण्याचे आवाहन केले.
अमिषा पटेलने सशोल मीडियावर या संबंधित एक पोस्ट लिहिली. तसेच या नंबरचा स्क्रीनशॉट शेअर केला. अमिषाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये म्हटले की, हा नंबर बनावट आहे. हा माणूस फसवा आहे. तो लोकांना फसवत आहे.

