पुणे : प्रतिनिधी
अमृता फडणवीस नेहमी चर्चेत असतात. अमृता फडणवीस यांनी काल पुण्याचे माजी नगरसेवक किरण दगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या महिला मेळाव्याला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी महिलांशी संवाद साधला. त्यांनी महिलांना जगण्याचा मंत्र सांगितला आहे. अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांचे नाव घेत उखाणादेखील घेतला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या गायिका आहेत. त्याचसोबत त्या सामाजिक कार्यात सक्रिय असतात. त्यांनी महिलावर्गाला संबोधित करताना देवेंद्र फडणवीसांसाठी उखाणा घेतला आहे.
अमृता फडणवीस कार्यक्रमात म्हणाल्या की, मी त्यांच्यासाठी आज चार ओळी म्हणणार आहे. ‘आज माझ्या नणंदा दिसत आहेत खास, देवेंद्रजी आहेत तुमच्या पाठीशी, प्रगती व्हावी तुमची झक्कास.’
या कार्यक्रमात बोलताना त्यांनी महिलांना आपल्या नणंदा म्हटले आहे. त्यांनी महिलांना जगण्याचा मंत्र सांगितला आहे. त्या म्हणाल्या की, आता आपलं नातं नणंद-भावजयीचं आहे. मी पुन्हा येईल पण लेट नाही येणार. मला उशीर झाला तर मी तुम्हाला सॉरी म्हणणार नाही. कौशल्य विकास याचे पण आज उद्घाटन केले आहे आणि ते आपल्यासाठी स्त्रियांसाठी. आपण, आपलं कुटुंब बलिष्ठ तर आपला समाज बलिष्ठ आणि मग आपला देश बलिष्ठ.