33.6 C
Latur
Saturday, April 26, 2025
Homeअंतरराष्ट्रीयअमेरिका सावध : भारत-पाक तणाव त्यांच्या पातळीवर मिटेल

अमेरिका सावध : भारत-पाक तणाव त्यांच्या पातळीवर मिटेल

व्हॅटिकन सिटी : वृत्तसंस्था
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सावध भूमिका घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांना भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावाबद्दल विचारण्यात आले. तेव्हा ट्रम्प म्हणाले की, हा हल्ला खूप वाईट आहे. पण, मी भारताबरोबरच असून पाकिस्तानसाठीही खूप जवळचा आहे. भारत आणि पाकिस्तान त्यांच्या पातळीवर मिटवून घेतील, अशी भूमिका ट्रम्प यांनी मांडली.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, मी भारतासाठी खूप जवळचा आहे आणि पाकिस्तानसाठीही. जसे की तुम्हाला माहिती आहे, काश्मीर प्रश्नावरून दोन्ही देशांमध्ये मागील अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. काश्मीर प्रश्न अनेक वर्षांपासूनचा आहे. पण, जो दहशतवादी हल्ला झाला, तो खूपच वाईट आहे. खूपच वाईट झाले.

भारत पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावाबद्दल ट्रम्प म्हणाले, त्यांच्या सीमेवर अनेक वर्षांपासून तणावपूर्ण परिस्थिती आहे. नेहमीच अशी स्थिती राहिलेली आहे. पण मला विश्वास आहे की, ते (भारत-पाकिस्तान) कोणत्या न कोणत्या पद्धतीने यातून मार्ग काढतील. मी दोन्ही नेत्यांना ओळखतो.

इराणचा मध्यस्थीचा प्रस्ताव
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेल्यानंतर इराणने दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सईद अब्बास अराघची यांनी म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तान बंधुत्व असलेले शेजारी आहेत. दोन्ही देशात शांतता आणि स्थिरता राहावी, हीच इराणची प्राथमिकता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR