30.1 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeअंतरराष्ट्रीयअमेरिकेला युद्ध हवे, तर आम्हीही तयार : जिनपिंग

अमेरिकेला युद्ध हवे, तर आम्हीही तयार : जिनपिंग

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणाने संपूर्ण जगातच खळबळ उडवून दिली आहे. मात्र आता बुधवारी चीनने अमेरिकेला प्रत्युत्तर देत थेट आव्हान दिले आहे.  जर अमेरिकेने व्यापार निर्बंधांच्या स्वरूपात युद्ध सुरू केले असेल तर आम्हीही त्याचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. जर अमेरिकेने व्यापार युद्ध सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असेल तर आम्ही हे युद्ध शेवटपर्यंत लढू, असे चीनने म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरीफ धोरणासंदर्भात चीनच्या अमेरिकेतील दूतावासाने एका निवेदनात म्हटले आहे की, जर अमेरिकेला युद्ध हवेच असेल, तर मग ते टॅरिफ युद्ध असो, व्यापार युद्ध असो अथवा इतर कुठल्याही स्वरुपाचे युद्ध असो, आम्ही ते युद्ध शेवटपर्यंत लढण्यास तयार आहोत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिलपासून भारत, चीन आणि इतर देशांवर कर लादण्याची घोषणा केल्यानंतर, चीनचे हे विधान आले आहे.
अमेरिकेच्या या धोरणावर प्रतिक्रिया देताना, आपण अमेरिकेच्या व्यापार धोरणांचा सामना करण्यासाठी तयार आहेत. तसेच, कुठल्याही प्रकारच्या आर्थिक संघर्षापासून मागे हटणार नाही आणि शेवटपर्यंत ही लढाई लढणार, असे चीनने म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, यामुळे व्यापारात तणाव निर्माण होऊ शकतो. खरे तर, चीन आणि अमेरिका यांच्यात आधीपासूनच अनेक विषयांवर मतभेत आहेत.
चौकट
भारतावर २ एप्रिलपासून टेरिफ लागू
डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी पहाटे भारताला मोठा धक्का दिला. ते म्हणाले की, भारत आमच्याकडून १०० टक्क्यांहून अधिक शुल्क आकारतो, आम्हीही पुढील महिन्यापासून तेच करणार आहोत. टॅरिफ म्हणजे कोणताही देश दुस-या देशातून येणा-या वस्तू किंवा सेवेवर आकारत असलेले आयात शुल्क. आता रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे जशास तसे. उदा. एखादा देश दुस-या देशावर २० टक्के आयात शुल्क लादत असेल. अशा परिस्थितीत दुस-या देशानेही २० टक्के शुल्क आधीच्या राष्ट्रावर लादले तर त्याला रेसिप्रोकल टॅरिफ म्हणतात.
रेसिप्रोकल टॅरिफचा इतिहास
रेसिप्रोकल टॅरिफ १९ व्या शतकापासून सुरू झाले. १८६० मध्ये, ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यात कोब्डेन-शेव्हलियर करार झाला, त्यानुसार आयात शुल्क कमी करण्यात आले. यानंतर १९३० च्या दशकात युनायटेड स्टेट्सने स्मूट-हॉले टॅरिफ कायदा लागू केला, ज्यामुळे जागतिक व्यापारावर परिणाम झाला आणि महामंदी आली. अलीकडे, ट्रम्प प्रशासनाने चीन, युरोपियन युनियन आणि इतर देशांवर शुल्क लादले, ज्याच्या प्रत्युत्तरात त्या देशांनी देखील अमेरिकन वस्तूंवर कर लादले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR