लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणा-या भाजपा पदाधिकारी माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर हे अध्यक्ष असलेल्या जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा(जेएसपीएम) संचलित येथील जुन्या एमआयडीसी परिसरातील स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ वसतिगृहात इयत्ता ७ वी वर्गात शिक्षण घेत असलेल्या १३ वर्षीय अरविंद खोपे याचा संस्थेच्या वस्तीगृहात संशयास्पद मृत्यूच्या घटनेत पोलीसांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असेलेल्या दोन्ही आरोपींचा जामीन मागणीचा अर्ज जिल्हासत्र न्यायालयाने गुरुवार फेटाळला.
येथील जुन्या एमआयडीसी परिसरातील स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ वसतिगृहात अरविंद खोपे या अल्पवयीन मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. २९ जुलैच्या रात्री घडली होती. मुलाचा खुन करण्यात आल्याचा आरोप चिमुकल्या अरविंदच्या पालक व नातेवाईकांडून केला जात आहे. याप्रकरणी सदरील गुन्हा दाखल असलेल्या एमआयडीसी पोलीसांनी स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ वसतिगृहातील कर्तव्यावर असलेल्या वस्तीगृह व्यवसथापक विठ्ठल सुर्यवंशी व विनायक टेकाळे नामक व्यक्तीना अरविंदच्या मृत्यूचा पुरावा नष्ट केल्या प्रकरणी गजाआड केले होते.
या आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या आरोपींनी जिल्हासत्र न्यायालयाकडे जामीन मागणीचा अर्ज केला होता. या जामीन अर्जावर दि. २१ ऑगस्ट रोजी सुणावणी पार पडली. या जामीन अर्जावर जिल्हासत्र न्यायालयाने दि. २२ ऑगस्ट रोजी सदरील जामीन अर्ज फेटाळल्याचा निर्णय दिला असून सुणावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे अॅड. लक्ष्मण शिंदे यांनी तर फिर्यादी पक्षातर्फे अॅड. प्रतिक कांबळे, अॅड.रमक जोगदंड, अॅड. प्रितम कांबळे, अॅड. महेबुब घंटे यांनी बाजू मांडली.