22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयअर्थसंकल्पात विरोधी शासित राज्यांशी भेदभाव

अर्थसंकल्पात विरोधी शासित राज्यांशी भेदभाव

इंडिया आघाडीने संसद परिसरात केली निदर्शने

नवी दिल्ली : २०२४ च्या अर्थसंकल्पात भेदभाव केल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारवर हल्ले तीव्र केले आहेत. बिहार आणि आंध्र प्रदेशलाच या अर्थसंकल्पात महत्व देण्यात आले असून, विरोधी शासित राज्यांना अर्थसंकल्प देण्यात हात आखडता घेतला, असा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तिस-या दिवशी विरोधी पक्षाचे सदस्य संसदेच्या संकुलात पोहोचताच त्यांनी सरकारवर हल्लाबोल करत जोरदार निदर्शने केली.

या निदर्शनात काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी, टीएमशी खासदार डेरेक ओब्रायन, जया बच्चन, सपाचे अध्यक्ष खासदार अखिलेश यादव, काँग्रेस खासदार शशी थरूर, ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुवेर्दी, आपचे खासदार संजय सिंह यांच्यासह मोठ्या प्रमानात विरोधी खासदार सहभागी झाले होते.

यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशला महत्वाचे स्थान देण्यात आले आहे हा अन्य राज्यावर अन्याय आहे. या अर्थसंकल्पातून विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांना अर्थसंकल्पातून दूर ठेवले आहे. आमचा या कृतीला विरोध आहे, असे खरगे म्हणाले.

अखिलेश यादव यांचा टोला : सपा प्रमुख
दरम्यान, सपा प्रमुख अखिलेश यादव म्हणाले की, शेतक-यांना आधारभूत किंमत देण्याऐवजी सरकार त्यांच्या आघाडीतील भागीदारांना आधारभूत किंमत देत आहे. उत्तर प्रदेशमध्ये दुहेरी इंजिन सरकार असून देखील काय मिळाले असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. असेल तर दुहेरी फायदा व्हायला हवा होता, दिल्लीचा फायदा लखनौचा फायदा आहे पण दिल्ली आता लखनौकडे पाहत नाही किंवा लखनौच्या जनतेने दिल्लीच्या जनतेवर नाराजी व्यक्त केली आहे आणि त्याचा परिणाम अर्थसंकल्पात दिसत आहे. असा आरोप ही त्यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR