22.1 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeअलकनंदा नदीत मिनी बस कोसळली; १२ ठार, ५ जखमी

अलकनंदा नदीत मिनी बस कोसळली; १२ ठार, ५ जखमी

रेंतोली : वृत्तसंस्था
उत्तराखंडमधील बद्रीनाथ महामार्गावर भीषण अपघात घडला. या मार्गावरुन वेगाने जात असलेल्या मिनी बस ट्रॅव्हरलच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते वाहन थेट अलकनंदा नदीत पडले. या बसमधून प्रवास करणा-या प्रवाशांपैकी १२ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रुद्रप्रयाग शहरापासून ५ किमी अंतरावर बद्रीनाथ महामार्गावरील रेंतोली जवळ ही दुर्घटना घडली. स्थानिक नागरिक व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून नदीत पडलेली मिनी बस बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक डॉ. विशाखा भदाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, बचाव पथकाला पाचारण करण्यात आले असून मिनी बससह अपघातील जखमींना पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना तात्काळ जवळील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. मात्र, या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून ५ जण जखमी आहेत. अद्याप मदतकार्य सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR