34.6 C
Latur
Monday, April 14, 2025
Homeमहाराष्ट्रअल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणा-या नराधम विशाल गवळीची आत्महत्या

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणा-या नराधम विशाल गवळीची आत्महत्या

नवी मुंबई : प्रतिनिधी
कल्याण पूर्वेकडील एका १३ वर्षीय मुलीचे अपहरण करत, तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने रविवारी सकाळी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तेथेच त्याने पहाटे ४ ते ५ च्या सुमारास शौचालयात आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, त्याच्या या आत्महत्येची न्यायाधीशांकडून चौकशी केली जाणार आहे.

कल्याणमध्ये अवघ्या १३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करणारा नराधम विशाल गवळी याने नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशाल गवळी याने तुरुंगातील कोठडीत गळफास लावून आत्महत्या केल्याचे समजते.

कारागृहात पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास विशाल गवळी याने शौचालयात जाऊन गळफास लावून घेतल्याचे कळते. या घटनेमुळे तळोजा कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. विशाल गवळी याच्या आत्महत्येनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. निवृत्त न्यायाधीशांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे समजते.

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात कल्याणच्या कोळसेवाडी परिसरातील अल्पवयीन मुलीला फूस लावून विशाल गवळी याने स्वत:च्या घरी आणले होते. घरात त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार कोणाला कळू नये म्हणून विशालने घरातच या मुलीची हत्या केली होती. त्यानंतर विशाल गवळीने या मुलीचा मृतदेह बापगाव परिसरात फेकून दिला होता. त्यानंतर विशाल गवळी हा शेगावला पळून गेला होता. शेगाव पोलिसांनी सापळा रचत शिवाजी चौकातील एका सलूनमधून त्याला ताब्यात घेतले होते.

या अपहरण आणि हत्या प्रकरणात विशाल गवळीच्या तिस-या पत्नीने त्याला मदत केली होती. विशाल गवळीने पहिल्या दोन बायकांप्रमाणे आपल्याला सोडून देऊ नये यासाठी पत्नीने या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याचे नंतर सांगितले होते. एका रिक्षातून मृतदेह भिवंडीजवळील बापगाव परिसरात दोघांनी मिळून फेकून दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR