22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरअल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार

देवणी : प्रतिनिधी

देवणी तालुक्यात वलांडी येथील एका सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले शुक्रवारी दि. २६ वलांडीत बाजारपेठ बंद ठेवत ंिनलगा उदगीर राज्यमार्गावर ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको अंदोलन करण्यात आले. सहा वर्षाच्या एका अल्पवयीन चिमुरड्या मुलीवर सतत पाच दिवस अनैसर्गिक अत्याचार करणा-या आरोपी विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (पोक्सो), अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत बुधवारी दि. २५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीस शुक्रवारी दुपारी दीड वाजता देवणी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दि. १५ ते १९ जानेवारी दरम्यान पिडीतेच्या घराशेजारील आरोपी अल्ताफ महेबुब खुरेशी यांने सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान स्वत:च्या घरात बोलावून पिडीतेवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली असुन पिडीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून देवणी पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटेकर करीत आहेत. सदरील घटनेची माहिती वलांडीसह परिसरातील गावांमध्ये पसरताच सकाळी अकरा ते एक यादरम्यान उदगीर -निलंगा या राज्य महामार्गावर ग्रामस्थ, व्यापारी व परिसरातील गावातील नागरिकांनी एकत्र येत येथील छत्रपती शिवाजी महाराज या मुख्य चौकात निषेधाचे फलक दाखवत दोन तास रास्ता रोको करून व काळ्या फिती बांधून घटनेचा निषेध नोंदवला. तसेच पोलीस प्रशासनाने घटनेचा जलद गतीने तपास करावा व आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी करीत पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांना निवेदन दिले. पिडीतेस न्याय मिळावा याकरिता सायंकाळी साडेसहा वाजता महिलांनी राममंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा कँडल मार्च काढत घटनेचा निषेध नोंदवला.

पोलिस अधीक्षकांची भेट व शांतता बैठक
शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता पोलिस अधीक्षक सोमय मुंडे व अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजय देवरे यांनी वलांडी येथे भेट देत कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती जाणून घेतली. यावेळी येथील पोलिस चौकीत तहसीलदार गजानन श्ािंदे, माजी आमदार धर्माजी सोनकवडे यांच्या उपस्थितीत ग्रामस्थासोबत शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत बोलताना पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी या प्रकरणाचा तपास जलद गतीने करण्या करिता नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखत पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

घटनेच्या निषेधार्थ बाजारपेठ बंद
दि. २६ जानेवारी रोजी व्यापा-यांनी घटनेच्या निषेधार्थ दिवसभर बाजारपेठ कडकडीत बंद ठेवली. त्यामुळे आठवडी बाजाराचा दिवस असल्याने खरेदीसाठी आलेल्या अनेकांना रित्या हाताने परतावे लागल्याने मोठी गैरसोय झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR