19.2 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeसोलापूरअल्पवयीन विवाहित मुलीचीआत्महत्या, दोन महिन्यांनी गुन्हा दाखल

अल्पवयीन विवाहित मुलीचीआत्महत्या, दोन महिन्यांनी गुन्हा दाखल

सोलापूर : दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अल्पवयीन विवाहित मुलीच्या आत्महत्येची पोलिसांत खबर न देता प्रेताचा परस्पर अंत्यविधी उरकण्यात आल्याच्या घटनेचा गुन्हा अखेर उशिराने माढा पोलिसांनी दाखल केला आहे. यात महिलांवरील अत्याचारांच्या प्रकरणी पोलिसांच्या संवेदना किती बोथट झाल्या आहेत, याची विदारक परिस्थिती दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीवरून समोर येत आहे.

माढा तालुक्यातील शिंदे वाडीत घडलेल्या या घटनेची माहिती स्थानिक पोलीस पाटलांस दोन दिवसांनी मिळाली खरी; परंतु गुन्हा मात्र जवळपास दोन महिन्यांनी दाखल झाला आहे.
या संदर्भात दाखल झालेल्या फिर्यादीत नमूद माहितीनुसार ही घटना माढ्याजवळ शिंदेवाडी गावात २४ डिसेंबर २०२३ रोजी मध्यरात्री नंतर घडली होती. तनुजा अनिल शिंदे (वय-१४ वर्षे, रा. शिंदेवाडी) हिचे लग्न ती अल्पवयीन असतानाही तिचे वडील अनिल नारायण शिंदे व चुलते सुनील नारायण शिंदे यांनी लावून दिले होते.

ती तिच्या नवऱ्याकडे नांदत नसून अन्य दुस-या गावातील एका तरूणाच्या संपर्कात होती. २४ डिसेंबर २०२३ रोजी पहाटे अडीचच्या सुमारास तनुजा ही गावाबाहेर कालव्याजवळ अज्ञात तरूणाबरोबर पळून जाताना तिचे चुलते धनाजी शिंदे यांनी पाहिले. तिच्याजवळ थोड्या अंतरावर थांबलेली दोन मुले धनाजी शिंदे यांना पाहून पळून गेली. त्यावेळी धनाजी यांनी तनुजा हिला थांबवून, तू यावेळी येथे काय करतेस, अशी विचारणा केली. त्यावर तिने खोटे कारण सांगितले. तेव्हा धनाजी याने भाऊ सुनील यास बोलावून घेतले आणि तिला मारहाण करून शेतात घरी आणले. नंतर मनःस्ताप होऊन तनुजा हिने विषप्राशन करून आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलीस ठाण्यास न कळविताच शिंदे कुटुंबीयांनी तिचा परस्पर अंत्यविधी उरकला. त्याची वाच्यता दोन दिवसांनी झाली. तेव्हा गावच्या पोलीस पाटील सुनीता आनंद शिंदे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळविली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR