21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरअल्लाह, मुल्कमे अमन और भाईचारा बरखरा रहे 

अल्लाह, मुल्कमे अमन और भाईचारा बरखरा रहे 

लातूर : प्रतिनिधी
आम्ही सर्व अल्हाची लेकरं आहोत. माणुस म्हणून आमच्या हातून कळत न कळत चुका झाल्या. त्या सुधारण्याची संधी देणारा सर्वेसर्वा अल्ल्हाहूतआला आपणच आहात. राग, लोभ, मत्सर, द्वेष, इर्शा या अवगुणांनी आम्ही पुर्ण गुरफटलो आहोत. या विकारांमुळेच आज सर्वच अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अल्लाहूतआला, आपल्या कृपेने आम्हला या विकारापासून मुक्ती देत ‘हमारे मुल्कमे अमन और भाईचारा बरखरा रहे’, अशी मुफ्ती सोहेल यांनी अल्लाहकडे केली.
लातूर शहरासह जिल्ह्यात ‘ईद-उल-फित्र’ दि. ११ एप्रिल रोजी उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. लातूर शहरातील ईदगाहवर सकाळी ९.३० वाजता मुफ्ती सोहेल यांच्या मागे ‘ईद-उल-फित्र’ची सामुहिक नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी समस्त मानवाच्या कल्याणासाठी अल्लाहकडे दुआ मागीतला. दोन्ही हात उचलून मनापासून गहिवरुन अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आली. तत्पुर्वी मुफ्ती  ओवेस यांचे बयान (प्रवचन) झाले. त्यांनी ‘ईद-उल-फित्र’च्या संदर्भाने कुरआन शरिफने दिलेला संदेश, हदीसमध्ये सांगीतलेला उपदेश आपल्या बयानमध्ये सांगीतला.  ‘ईद-उल-फित्र’निमित्त नवे कपडे, सुरमा, अत्तर, टोपी, रुपाल घेऊन मुस्लिम बांधव अगदी सकाळपासूनच ईदगाहकडे निघालेले होते. युवक, ज्येष्ठ, बच्चे कंपनीचा उत्साह होता.
पुरुष मंडळी ईदगाहकडे निघाली, घराघरातील महिला भगिणीही ‘ईद-उल-फित्र’च्या नमाजच्या तयारीला लागली. ईदगाहवर सामूहिक नमाज झाल्यानंतर शहरातील विविध मस्जिदमध्ये नमाज झाला. जे ईदगाहवर पोहोचू शकत नाहीत, अशा ज्येष्ठांसाठी मस्जिदमध्ये नमाजची सोय करण्यात आलेली होती. गेल्या तीन दिवसांपासून लातूर शहर व परिसरात पावसाची हजेरी आहे. या पावसामुळे उडाक्यापासून उसंत मिळाली. अल्हाददायक वातावरणात ‘ईद-उल-फित्र’ उत्साहात साजरी करण्यात आली.
या वेळी डॉ. शिवाजी काळगे, आमदार विक्रम काळे, खासदार सुधाकर श्रृंगारे, पोलिस अधिक्षक सोमय मुंडे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी महापौर सुरेश पवार, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, मोइराष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय शेट्टे, सर्जेराव मोरे, अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, विकास कांबळे, नवनाथ आल्टे, अ‍ॅड. प्रदिपसिंह गंगणे, सुंदर पाटील, अंकुश नाडे, अ‍ॅड. फारूक शेख, हमीद बागवान, यूसुफ बाटलीवाले, यूनुस मोमीन, गणेश एस. आर. देशमुख, सचिन बंडापल्ले, अ‍ॅड. गणेश गोमसाळे, तहसिलदार सौदागर तांदळे, अजगर पटेल यांनी उपस्थित राहून ईदच्या शुभेच्छा दिल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR