15.2 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeराष्ट्रीयअल-कायदाच्या टेरर फंडिंग नेटवर्कचा पर्दाफाश

अल-कायदाच्या टेरर फंडिंग नेटवर्कचा पर्दाफाश

एनआयएचे देशभरात अनेक ठिकाणी छापे संशयित बांगलादेशस्थित अल कायदा नेटवर्कशी संबंधित

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोमवार दि. ११ नोव्हेंबर रोजी दहशतवादी संघटना अल कायदाशी संबंधित संशयितांच्या विरोधात देशभरात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवली. या कारवाईअंतर्गत जम्मू-काश्मीर, कर्नाटक, पश्चिम बंगाल, बिहार, त्रिपुरा आणि आसामसह नऊ ठिकाणी छापे टाकण्यात आले.

एनआयएची ही कारवाई दहशतवादाबाबत देशाची सुरक्षा आणि संरक्षण धोरण मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. छापेमारीत टेरर फंडिंगशी संबंधित अनेक डिजिटल उपकरणे, बँकिंग कागदपत्रे आणि पुरावे समोर आले आहेत. एनआयएनुसार, हे संशयित बांगलादेशस्थित अल कायदा नेटवर्कशी संबंधित आहेत. हा गट भारतात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय तरुणांना भडकवण्याचा आणि निधी देण्याचा कट रचत होता. एनआयएचा हा छापा २०२३ मध्ये दाखल झालेल्या एका खटल्याशी संबंधित आहे, ज्यामध्ये संशयितांनी दहशतवादी कारवायांना निधी पुरवल्याचा आरोप आहे.

डिजिटल उपकरणे जप्त
एनआयएने कारवाईदरम्यान मोबाईल फोन आणि इतर डिजिटल माध्यमांसह अनेक डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या बँकिंग दस्तऐवजांमध्ये बांगलादेशातून दहशतवादाला निधी दिल्याचे समोर आले आहे. एनआयएच्या म्हणण्यानुसार, अल कायदाला निधी पुरवणा-या अनेक बांग्लादेशी नागरिकांचे संपर्क उघड झाले आहेत, ज्यांच्यामार्फत हा निधी भारतात पोहोचवला जात होता.

भारतीय तरुणांना भडकावण्याचे षडयंत्र
एनआयएने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, संशयित अल कायदाला निधी देण्याचा आणि भारतातील तरुणांना कट्टरपंथी बनविण्याचा प्रयत्न करत होते. भारतीय तरुणांना कट्टरपंथी विचारसरणीकडे आकर्षित करून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करून घेण्याचा आरोपीचा उद्देश होता. अल कायदाशी संबंधित अनेक बांग्लादेशी नागरिक या प्रयत्नात सामील होते, जे भारतीय नागरिकांच्या सहकार्याने हे सर्व करत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR