लातूर : प्रतिनिधी
गेल्या आठवड्यात चार ते पाच दिवस ढगाळ वातावरणासह लातूर जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पाऊस पडल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या उत्पन्नावर झाला आहे. पावसामुळे शेतातील भाजीपाला काही प्रमाणात खराब झाला आहे. त्यामुळं लातूर बाजार समितीत येणारी भाजीपाल्याची आवक चांगलीच घटल्याचे दिसून येत आहे.
लातूर कृषी उत्पन्न भाजीपाला बाजारात पावसामुळे लातूर जिल्ह्यासह शेजारी जिल्ह्यातून दाखल होणा-या पालेभाज्यांची आवक काही प्रमाणात घटली असून कांदा आणि लसूनच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात कांदा आणि लसूनच्या दरात २० ते ३० रुपयांनी वाढ झाली असून, सर्वच पालेभाज्यांचे दर चढेच राहतील अशी शक्यता व्यापारी वर्गाने वर्तवली आहे. शहरातील घाऊक बाजारपेठेत भाजीपाल्यांची मागणीपेक्षा आवक कमी असल्यामुळे भाज्यांचे भाव कडाडले आहेत. आवश््यक असलेल्या भाज्यांचे दरात मागील आठवड्यापासून वाढ झालेली दिसन येत आहे. आवकाळी पाऊसामुळे जिल्हयातील पालेभाज्यांचे पिक घेणा-या शेतक-यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात काही प्रमाणात वाढ झाल्याचे व्यापा-यांनी सागीतले आहे. यात काकडी ३० ते ४० रुपये किलो, गवारी ६० रुपये किलो, भेंडी ५० रुपये किलो, कारले ५० रुपये किलो, पत्तागोभी ४० रुपये किलो, मिरची ७० ते ८० रुपये किलो, शेपु ३० रुपये पेंडी, वागें ४० ते ५० रुपये किलो, शेवगा ८० ते ९० रुपये किलो, मेथी २५ ते ३० रुपये पेंडी, कडिपत्ता २० रुपये किलो, दोडका ६० रुपये किलो, शिमला मिरची ६० ते ७० रुपये किलो, लिंबू ८० ते ९० रुपये किलो, अदरक १५० ते १७० रुपये किलो, कोथीबिर ३० ते ४० रुपये किलो, टोमॅटो ४५० ते ५०० रुपये कॅरेट, गाजर ६० रुपये किलो, फुलगोभी ५० रुपये किलो, बटाटा ४० ते ५० रुपये किलो, कांदा पाथ ३० ते ४० रुपये पेंडी, काळे वागें ५० ते ६० रुपये किलो, वरणा ६० रुपये किलो, गावरान वागें ३० ते ४० रुपये, कांदा ४५ ते ६० रूपये किलो, लसून १७० ते २०० रुपये प्रतिकिलो प्रमाणे घाउक बाजारात विक्री केली जात आल्याचे किरकोळ व्यापारी मिनाझ बागवान यांनी सागीतले.