उदगीर : प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील तोंडार येथील विलास सहकारी साखर कारखाना लि. युनीट-२ या कारखाना साईट व परिसरात दि. १४ मे २०५ रोजी दुपारी २.३० ते ३ या कालावधीमध्ये अचानक झालेल्या अवकाळी पावसाने अगदी थैमान घातले आहे. यामुळे कारखान्याचे मोठे नूकसान झाले.
अवकाळी पावसासोबतच सोसायट्याचा वारा होता. त्यामुळे कारखान्याचे साखर पोत्यांनी भरुन असलेल्या टेम्पररी गोडावून क्रमांक-२ व ४ वरील ताडपत्री उडून गेली. यात अंदाजे २५००० क्विंटल साखर भिजली आहे. तसेच फॅक्टरी बिल्डींगवरील जवळपास ४०० पत्रे उडून गेले. त्यामुळे एकंदरीत कारखान्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नूकसान झाले. याबाबत कारखाना प्रशासनाच्या वतीने उदगीर तहसीलदार यांच्याकडे रिपोर्ट सादर करुन योग्य ते सहकार्य करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती विलास सहकारी साखर कारखाना लि. युनीट-२ चे काकर्यकारी संचालक ए. आर. पवार यांनी दिली.