22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरअवैध धंद्यांविरोधात आंदोलनाचा ईशारा

अवैध धंद्यांविरोधात आंदोलनाचा ईशारा

सोलापूर : शहर व परिसरात सुरू असलेले अवैध धंदे तत्काळ बंद करावेत अन्यथा १० जूनपासून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भीम सैनिक प्रतिष्ठानच्यावतीने पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.

सोलापूर शहर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मटका, जुगार, हातभट्टी दारू, सट्टा, आयपीएल सट्टा, डान्स बार, गुटखा असे अनेक अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. पोलिसांच्या सहकार्याने हे सर्व अवैध धंदे सुरू असून त्याचा विपरीत परिणाम समाजबिघडण्यात होत आहे.

बेरोजगार तरूण व्यसनाधीन होत आहेत. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. शहरातील अवैध धंदे पोलीस दलातील काही वसुलदारांच्या आशीर्वादानेच सुरू आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला. शहरातील अवैध धंदे तातडीने बंद करावेत अन्यथा १० जूनपासून जिल्हा परिषदेसमोरील पूनम गेटवर आंदोलन करण्यात येईल, असे पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी सुहास बनसोडे, वसंत देढे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR