27.4 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeलातूरअहमदपुरात अग्रिमसाठी शेतक-यांचा रास्ता रोको

अहमदपुरात अग्रिमसाठी शेतक-यांचा रास्ता रोको

अहमदपूर : प्रतिनिधी

तालुक्यातील शेतक-याना सरसकट सर्वच मंडळात अग्रीम कृषी विम्याची रक्कम मिळावी यासाठी तहसील कार्यालयासमोर आमरण सुरू असून शासनाला जागे करण्यासाठी येथील सावरकर चौकात दि ११ रोजी सोमवारी संतप्त शेतक-यांंनी रास्ता रोको आंदोलन केले आहे. यामध्ये तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. एसबीआई विमा कंपनी ही शेतक-यांचे दिवाळे काढणारी कंपनी आहे. ज्या ठिकाणी पावसाचा २१ दिवसकिंवा त्यापेक्षा अधिक खंड पडला आहे अशा शेतक-यांंना काही भागात विमा वाटप करण्यात आला आहे. याप्रमाणेच अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर, हाडोळती, खंडाळी, अंधोरी, किनगाव, या मंडळांना आग्रीम रक्कम जमा करण्यात आली नाही. ती तातडीने जमा करावी या मागणीसाठी सावरकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या विविध मागण्यांचे निवेदन देऊन १ महिना उलटला तरी कोणत्याही विभागाकडून शेतक-यांच्या मागण्या मान्य न झाल्याने दि ६ डिसेंबरपासून सहदेव व्होनाळे, कमलाकर गायकवाड,अमरण उपोषणास बसले आहेत उपोषणाचा आज ६ वा दिवस आहे. उपोषण कर्त्याची प्रकृती खालावत चालली आहे. याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देणे खुप गरजेचे आहे.अशीही मागणी यावेळी करण्यात आली. या अंदोलनात हाडोळती ,रोकडा सावरगाव, खंडाळी, किनगाव, अंधोरी, या भागातील शेतकरी सहभागी झाले होते. तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले असल्यामुळे त्यांनी स्वंयस्फूर्तपणे एकत्रीत येऊन येथील सावरकर चौकात हे रास्ता रोको आंदोलनाचा मार्ग स्वीकारलेला आहे.

या अंदोलनात हरिंश्चद्र महाळंकर, गणपत खंदाडे, मंगेश स्वामी, संतोष रेड्डी, दत्ता खंदाडे परमेश्वर स्वामी,मौलाना बिलाल,गणेश माने, राहुल शेळके, जगन्नाथ पुणे, घोडके दयानंद, पाटील चंद्रकांत, केंद्रे दगडु, बालाजी केंद्रे, कमलाकर गायकवाड, घोडके पद्माकर, घोडके रामेश्वर, व्यंकटी राठोड, पिराजी राठोड, बालाजी मरपडवाड, गंगाधर स्वामी, निशांत हांडे, नागपुर्णे माधव, व्यंकोबा चांदेवाड, ज्ञानोबा चांदेवाड, रामदास रोकडे, शिवाजी टेकाळे, माधव सूर्यवंशी, नामदेव
कदम, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR