अहमदपूर : प्रतिनिधी
सकल मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी अहमदपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्वपक्षीय मराठा नेत्यांचे सामुहिक श्राद्ध घालणे व जेलभरो आंदोलन आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार करण्यात आले.
सकल मराठा समाजाच्या वतीने श्राद्ध घालणे कार्यक्रमात संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या एक वर्षापासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून ते ही ५० टक्यांच्या आत आरक्षण मिळावे, यासाठी लोकशाही मार्गाने मराठा समाजाच्या वतीने वर्षभरात महाराष्ट्रात विविध मार्गाने आंदोलने केले व अंतरवाली सराटी जि.जालना येथे झालेल्या अमानुष लाठीचार्ज व गोळीबारास एक वर्ष पूर्ण होऊनही महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या कोणत्याच मागण्या मान्य केल्या नाहीत. त्याउलट शासनाने आंदोलकांवरच खोटे गुन्हे दाखल केले आहेत.
आंदोलकावरील गुन्हे मागे घेणे व मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण देण्याचे वचन सरकारने तीन वेळेस दिले होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन आरक्षण देण्याचा शब्द दिला होता तो ही पाळला नाही तसेच ४०० वर्षापूर्वी बांधलेले गढकिल्ले आणखीन मजबूत असून ८ महिन्याखाली बसवलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वा-याने पडला असे बेताल वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले हे अशोभनीय असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याचा निषेध म्हणून दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, अहमदपूर या ठिकाणी सर्व पक्षीय मराठा नेत्यांचा श्राद्ध घालून आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रा. गोंिवद शेळके, प्रा.नाना कदम, प्रा. रोहिदास कदम, प्रा.विनोद माने, शिवशंकर लांडगे , जयराम पवार, देवानंद मुळे आदींनी यावेळी समाजाच्या वतीने शोक व्यक्त केला. यावेळी प्रा. गोंिवद शेळके, विजयकुमार बोडके, गणेश पवार, सुनील पवार,माणिक कदम, प्रवीण मुळके, बालाजी कदम जवळगेकर, धनंजय साखरे, श्रीधर तराटे, शिवाजी पाटील, शिवानंद भोसले,आगलावे, सुनील पाटील, धनराज पाटील, शिवशंकर लांडगे,पि.के. मुळे, मुकेश पाटील, दत्तात्रय अडसूळ, शैलेश जाधव, शिवाजी पाटील, सतीश नवटक्के, सिद्धार्थ दापके, राम मुळके, विशाल जाधव, भास्कर जाधव, विजय पवार यांच्यासह असंख्य सकल मराठा समाज बांधव उपस्थिती होता. वर्षश्राद्ध कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड.आनंद जाधव व सुत्रसंचालन मुकेश पाटील यांनी केले. यावेळी सकल मराठा समाजाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.