21.2 C
Latur
Thursday, October 24, 2024
Homeलातूरअहमदपूर-चाकूर मतदारसंघात दीड डझन इच्छूक 

अहमदपूर-चाकूर मतदारसंघात दीड डझन इच्छूक 

चाकूर : प्रतिनिधी
अहमदपुर-चाकूर मतदारसंघातील आजी-माजी आमदारांसह विविध पक्षातून इच्छुक असलेले उमेदवार तसेच अपक्ष निवडणूक लढू इच्छीणारे दीड डझन नेते विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुकांनी मतदारसंघात संवाद दौरे सुरु केले असून जनतेच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेऊन मतदारांच्या गाठी-भेटी घेत असल्याचे पहावयास मिळत आहेत.
निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेले भावी आमदार आपआपल्या पक्षाकडे व इतर कोणता पक्ष उमेदवारी देईल याची चाचपणी करीत फिल्डींग लावताना दिसून येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर मतदारसंघात रणधुमाळी सुरु झाली असून विकासकामांचे श्रेय घेण्यापासून ते राजकीय आरोप-प्रत्यारोपमुळे राजकीय वातावरण तापल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांनी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून मतदारसंघात विकासकामे करण्याचा सपाटा सुरु केला आहे. मतदारांसोबत संपर्क वाढवून त्यांच्यासमोर केलेल्या विकास कामाचा लेखा जोखा मांडत आहे. विकास कामाच्या जोरावरच आ.बाबासाहेब पाटील राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटातून महायुतीकडून निवडणूक लढवणार आणि निवडून येणार असे त्यांचे कार्यकर्ते आत्मविश्वासाने सांगत आहे.
महायुतीकडून भाजपामधून गणेश हाके पाटील, माजी आ.बब्रुवान खंदाडे, दिलीपराव देशमुख, शिवाजी भिकाने, बालाजी पाटील चाकुरकर, यांचीसुद्धा नावे चर्चेत असून ते निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे ऐकावयास मिळत आहे तसेच भाजपाकडून उमेदवारीची मागणीही केली आहे. ते मतदारसंघात जनतेशी संवाद साधत मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. विविध कार्यक्रम घेऊन जोमाने कामाला लागून वातावरणनिर्मीती करीत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाकडून माजी सभापती अ‍ॅड.माधवराव कोळगावे, संचालक एन.आर.पाटील, माजी जि.प.सदस्य चंद्रकांत मद्दे, डॉ.अशोक सांगवीकर, सौ.ज्योतीताई पवार यांनीही पक्षाकडे तिकीटाची मागणी केल्याचे सांगितले.
महाविकास आघाडीकडून काँग्रेसची उमेदवारी मिळवून मीच आमदार होणार असल्याचे कार्यकर्ते, मतदार व जनतेसमोर सांगताना दिसून येत आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार यांच्याकडून माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील हे दावेदार असून महाविकास आघाडीतून निवडणूक लढण्यास ते सज्ज झाले  आहेत. मतदारसंघ त्यांना मोठे शक्ती प्रदर्शन करून तेही जनतेच्या संपर्कात आहेत. अहमदपूर-चाकूर विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुक आहेत. मनसे कडून डॉ.नरंिसग भिकाने,अपक्ष उत्तमराव वाघ, माधव जाधव हे उमेदवार आपणच मतदारसंघाचा विकास करू असे मतदारांना सांगत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR