अहमदपूर : प्रतिनिधी
तालूक्यातील अतिवृष्टी बाधीत शेतक-यांना शासनाकडून मिळणा-या अनुदानासाठी ३२३२ शेतक-यांनी अद्यापही ई-केवायसी करून घेतलेली नाही. दि. २५ मार्च २०२५ पर्यत ई-केवायसी न केलेल्या शेतक-यांची रक्कम शासनाकडे परत केली जाणार असून शेतक-यांनी त्वरित केवायसी करून अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
अहमदपूर तालूक्यात माहे सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचा पंचनामा करून बाधित झालेल्या क्षेत्रातील शेतक-यांना अनुदान वितरीत केले असून आजतागायत ४५८०४ शेतक-यांनी ई-केवायसी करून घेतल्यामूळे त्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झाली आहे. यात आज तागायत ६९१ शेतक-यांनी अनुदान संबंधीत तक्रारी दाखल केल्या आहेत. या लाभार्थीनी आपल्या सहमती पत्राच्या व इतर कागदपत्राची पूर्तता संबंधीत तलाठी यांच्याकडे सादर करव्यात. तसेच प्रलंबीत ३२३२ शेतक-यांनी तलाठी कार्यालयाकडून संपर्क साधून ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. त्यांनी जवळच्या महा-ई-सेवा केंद्र किंवा आपले सरकार केंद्राच्या ठिकाणी जाऊन दि. २५ मार्च २०२५ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावी.