अहमदपूर : प्रतिनिधी
लातूर येथे शेतकरी पूत्र विजय घाडगे यांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सकल मराठा समाज व शेतक-यांच्या वतीने ठेवण्यात आलेल्या बंदला अहमदपूर शहरातील व्यापा-यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बंद शंभर टक्के यशस्वी केला. यावेळी शहरातील शैक्षणिक संस्थांनीही या बंदमध्ये सहभागी होत शाळांना सुट्टी जाहीर केली होती.
संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचे प्रकरण ताजे असतानाच परवा लातूर येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेलेले शेतकरी पुत्र विजय घाडगे पाटील यांच्यावर त्यांच्याच पक्षातील युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण व सहका-यांनी जाब का विचारला म्हणून बेदम मारहाण केली याचा निषेध व्यक्त करण्यासाठी अहमदपूर तालुक्यातील सकल मराठा समाज व शेतकरी यांच्या वतीने बंद पाळण्यात आला. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकाळपासूनच विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन महात्मा बसवेश्वर चौक ,मुख्य बाजारपेठ, आझाद चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, स्वामंत्र्यवीर सावरकर चौक या मार्गे फेरी काढत बंदचे आवाहन केले असता या आवाहनाला व्यापा-यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आस्थापने बंद ठेवत मारहाणीचा निषेध व्यक्त केला.
यावेळी उपस्थित नेत्यांनी आपल्या मनोगतात शिव- शाहू- फुले- आंबेडकर वादी विचारधारेवर होत असलेल्या हल्ल्याबाबत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत बेजबाबदार कृषी मंत्री, तसेच असंवेदनशील सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी विरोधी पक्षातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी सभापती आर.डी.शेळके, सोमेश्वर कदम, सुधीर गोरटे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सांब तात्या महाजन, डॉ. गणेश कदम , शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, माधवराव जाधव, विजय पाटील, रामभाऊ बेल्लाळे, सिराजुद्दीन जागीरदार, मराठा सेवा संघ जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ. रोहिदास कदम, प्रा. गोविंद शेळके, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अशोक चापटे, दत्ताभाऊ गलाले, संभाजी ब्रिगेडचे भीमराव नाना कदम, सिद्धार्थ दापके, शिवशंकर लांडगे, सहदेव होनाळे, सिद्धार्थ सूर्यवंशी, देवानंद मुळे, इमरोज पटवेगर, सचिन जाधव, गोविंद दगडे,अभिजीत माने, विकास महाजन, चेअरमन शिवकुमार कदम, माणिक कदम, बालाजी आगलावे, बालाजी कदम जवळेकर ,अर्जुन गंगथडे, मुकेश पाटील, संग्राम पवार, शिवानंद भोसले, अनिल पाटील, गणेश माने, ज्ञानेश्वर जाधव, शिवा भारती, गोपीनाथ जोंधळे, विश्वास कांबळे, कपिल मुरुडकर, परमेश्वर तिरकमटे, जयराम पवार, प्रविण मुळके, नीलकंठ पाटील, धनंजय साखरे, सुभाष गुंडीले, बागण शेख, राहुल शिवपुजे, किशोर कोरे, सुधाकर जगताप यांच्यासह शेतकरी बांधव यांची उपस्थिती होती.