लातूर : प्रतिनिधी
अॅड. मनोहरराव गोमारे पुरोगामी विचार मंच लातूरच्या वतीने अॅड. मनोहरराव गोमारे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आज दि. २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता अॅड. मनोहरराव गोमारे राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण व व्याख्यान होणार आहे.
मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात माजी कुलगुुरु डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात भारतातील ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व सामाजिक कार्यकर्ते प्रा. योगेंद्र यादव यांना अॅड. मनोहरराव गोमारे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात प्रा. योगेंद्र यादव यांचे ‘भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने व भवितव्य’, या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमास मराठवाड्यातील पुरोगामी चळवळीतील मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अॅड. मनोहरराव गोमारे पुरोगामी विचार मंच लातूरच्या वतीने करण्यात आले आहे.