हिंदी चित्रपटसृष्टीत कसदार कथानक आणि दमदार मांडणी असणा-या चित्रपटांची निर्मिती होत नाही, अशी टीका कलासमीक्षकांसह सिनेजाणकारांकडून होत असली तरी काही चित्रपटांना मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि त्यांनी केलेल्या कमाईचे आकडे हे या टीकेला छेद देणारे ठरतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे ‘अॅनिमल’ हा चित्रपट. साहित्यिक अभिरुची असणा-या समीक्षकांनी या चित्रपटावर खरपूस टीका केली असली तरी या चित्रपटाने अत्यंत कमी काळात ५०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. तिकिटबारीवर एवढी कमाई करणारा हा चौथा हिंदी चित्रपट आहे. का लाभली या चित्रपटाला इतकी लोकप्रियता?
ध्या सर्वत्र गाजत असलेल्या ‘अॅनिमल’ चित्रपटातील पात्र हे एखाद्या व्हीडीओ गेममध्ये मारधाड करणा-या पात्राशी मिळतेजुळते आहे. अर्थात व्हीडीओ गेम खेळणा-या मुलांचे समाजाशी असणारे नाते तुटल्यासारखेच असून ही स्थिती निर्माण होण्यास कोठे ना कोठे मुलांशी संवाद न साधणारी आणि संवादाचा आव आणणारी पिढी देखील तितकीच जबाबदार आहे. साहित्यिक अभिरुची असणा-या समीक्षकांनी अॅनिमल चित्रपटावर खरपूस टीका केली असली तरी या चित्रपटाने अत्यंत कमी काळात ५०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. तिकिटबारीवर एवढी कमाई करणारा हा चौथा हिंदी चित्रपट आहे. विशेष म्हणजे एवढी कमाई करणारे चारही चित्रपट मावळत्या वर्षात प्रदर्शित झाले आहेत. ‘पठाण’, ‘गदर-२’, ‘जवान’ आणि ‘अॅनिमल’ हे चार चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाले. चारही चित्रपटांत हिंसाचार ठासून भरलेला आहे आणि यापैकी तीन चित्रपट बाप-लेकाच्या संबंधावर बेतलेले आहेत. यातही सर्वाधिक चर्चा ही ‘अॅनिमल’चीच राहिली आहे. समाजशास्त्रतज्ज्ञांनी अशा धाटणीच्या चित्रपटांवरून चिंता व्यक्त केली आहे. कारण अशा चित्रपटांमुळे भारतीय पुरुषांची प्रतिमा बिघडत असल्याचे म्हटले आहे. या समीक्षकांत अनुराग कश्यप यांच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’सारख्या चित्रपटाला दर्जेदार चित्रपट म्हणून उपमा देणा-यांचाही समावेश आहे. तसेच ही मंडळी अकरा कुरोसावा, क्वेंटिन टेरेंटिनी आणि गाय रिची यासारख्या निर्मात्यांना महान असल्याचे सांगण्यात कोणताही संकोच बाळगत नाहीत. या मंडळींच्या चित्रपटांत हिंसा ओतप्रोत भरलेली दिसून येते.
तरीही ‘अॅनिमल’ चित्रपट कोण पाहतेय? या प्रश्नातच समाजशास्त्र तज्ज्ञांच्या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे. सिनेमा हा प्रारंभापासूनच समाजाचे प्रतिबिंब राहिलेला आहे. ज्येष्ठ नेते दिवंगत सुनील दत्त यांनी एकदा म्हटले होते, की जसा समाज तसा चित्रपट. हे मत आजही तंतोतंत लागू पडते. एखादा चित्रपट पाहून कारस्थान रचल्याचे, कट रचल्याचे किंवा स्फोट घडवून आणल्याचेही यापूर्वी आपण वाचले आणि ऐकलेही आहे. एवढेच नाही तर चित्रपटांतील हिंसेपेक्षा अधिक हिंसा ही प्रत्यक्षात घडली आहे आणि अनुभवलेली देखील आहे. चित्रपट निर्मात्यांनी बातम्यांच्या आधारे चित्रपटांची निर्मिती केली आणि सध्या तर ओटीटीच्या काळात अशाच चित्रपटांची आणि मालिकांची चलती आहे.
तूर्त ‘अॅनिमल’ चित्रपटाने विक्रमी कमाई केली असून त्याचे कलाकार आनंद व्यक्त करत आहेत. त्याच्यावरचे रील्स देखील प्रचंड व्हायरल होत आहेत. या चित्रपटांचे ट्रेलर पाहूनच काहींनी हा चित्रपट जोरदार कमाई करेल, असे संकेत दिले होते. पिता-पुत्रात होणारा संवाद हा दोन पिढीत असलेल्या अंतरामुळे होणा-या द्वंद्वाचे प्रतीक आहे. एकेकाळी किमान चार पिढ्या एकत्र राहत होत्या. आता सर्वात वयस्कर आणि सर्वांत कमी वयाच्या पिढीला बाजूला काढले तर मधल्या दोन पिढ्या आजघडीला समाज आणि घर चालवत आहेत. गेल्या आठ -दहा वर्षांत वयस्कर झालेल्या पिढीपासून ते गेल्या दोन-तीन वर्षांत ज्येष्ठ झालेली पिढी वगळता १८ ते २८ वयोगटातील तरुणांसाठी हा ‘अॅनिमल चित्रपट’ आहे. या पिढीशी संवाद न करणा-या समीक्षकांना आणि लेखकांना हा चित्रपट हिंसात्मक, क्रौर्य आणि अमानवी वाटू शकतो. त्यामुळेच या चित्रपटाचे नाव देखील ‘अॅनिमल’ आहे. ‘जानवर’ नावाने देखील चित्रपट तयार झाले आहेत. मनुष्य आणि प्राणी यांच्यात असणारा फरक काहीही सांगितलेला असो, मात्र मनुष्य हा एक समाजशील प्राणी असल्याचे वारंवार सांगितले जाते.
या ठिकाणी मुद्दा सामाजिक प्राणी हा असामाजिक होण्याचा आहे. परंतु तरुण पिढी आपला वेळ कसा व्यतित करत आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ही पिढी व्हीडीओ गेम खेळते, पीएस फोर, पीएस फाईव्हच्या विक्रीचे आकडे पाहिले तर नव्या धनाढ्य तरुणांत सर्वांत लोकप्रिय गेमिंग उपकरण असल्याचे कळून चुकेल. जगभरात व्हीडीओ गेमचा बाजार हा सिनेमापेक्षा मोठा आहे. व्हीडीओ गेम उद्योगात भारत देखील दुस-या देशांच्या तुलनेत पुढे जात आहे. कारण पडदा आणि मेंदू यांच्यात ताळमेळ साधण्यासाठी यापेक्षा दुसरा पर्याय आजच्या तरुण पिढीकडे दिसत नाही. कानात हेडफोन घालत आणि हातात व्हीडीओ गेम कंट्रोल ठेवत घरबसल्या इंटरनेटच्या माध्यमातून संवाद करत ही तरुण पिढी एकाचवेळी खेळत असतात. या खेळादरम्यान वापरली जाणारी भाषा ही मोठ्यांना ऐकण्यासारखी नसते. या व्हीडीओ गेममध्ये काय असते? एकटा किंवा टीम तयार करून अधिकाधिक लोकांना मारणे. ‘अॅनिमल’ मध्ये देखील एक खेळ नायक रणविजय सिंह खेळत असतो. व्हीडीओ गेममध्ये काल्पनिक प्रपंच उभारला जातो. संदीप रेड्डी वंगाने अर्जुन रेड्डी, कबीर सिंह आणि ‘अॅनिमल’ मध्ये या काल्पनिक प्रपंचाला व्यापक रूप देत मोठ्या पडद्यावर साकारले. ‘अॅनिमल’ हा या व्हीडीओ गेम जनरेशनचाच चित्रपट आहे. तरुण मित्रांसमवेत एकत्र पाहिला जाणारा हा चित्रपट एक असामाजिक नायकाच्या कथेच्या रुपातून हा एक सामाजिक प्रयोग असून तो यात त्याचे निर्माते यशस्वी झाले आहे.
‘अॅनिमल’ चित्रपटाला विरोध करण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे आतापर्यंतच्या हिंदी सिनेमात नायकाने जोपासलेली चौकट मोडून टाकणे हे देखील आहे. अनेक दृश्यं हे कथित ‘अल्फा मेल’ (शक्तिशाली नेता) ला समाजविघातक असल्याचे सिद्ध करण्यासाठी सांगतात. या दृश्यापैकीच काही दृश्यं म्हणजे प्रेम व्यक्त करताना नायिकेचे पाय धरणारा नायक किंवा करवाँ चौथच्या दिवशी आपल्या पत्नीला विवाहबा संबंधांची माहिती देणे आदी. ‘अॅनिमल’चा नायक अशा कल्पनाविश्वातील असून तो व्हीडीओ गेमच्या पार्श्वभूमीशी मेळ खाणारा असतो. व्हीडीओ गेम खेळणा-या पिढीचे समाजाशी असणारे नाते तुटले असून यासाठी काही अंशी घरातील मोठी मंडळी देखील जबाबदार मानली पाहिजे. ते पाल्यांशी संवाद करत नाही किंवा संवादाची औपचारिकता पार पाडत असता. वयात आलेल्या मुलीला तिच्या आवडीच्या नियोजित वराबाबत न बोलणा-या पिढीला या चित्रपटाचा आधार सामाजिक अस्वस्थता निर्माण करणारा वाटू शकतो. मात्र समाजात खळबळ उडवून देणे ही एक कला असते. सीजर ए क्रुझ यांनी देखील म्हटले, की विचलित लोकांना शांत करणारी आणि शांत लोकांना विचलित करणारी ही कला असते.
-सोनम परब