तुटलेले प्रेमसंबंध आत्महत्येचे कारण नव्हे!

नवी दिल्ली : संपुष्टात आलेल्या प्रेमसंबंधांमुळे एखादी व्यक्ती भावनात्मकदृष्ट्या अस्वस्थ होऊ शकते, परंतु गुन्हा करण्याचा हेतू नसल्याने तुटलेले संबंध हे आत्महत्येचे कारण ठरू शकत नाहीत, असे मत सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान दिले. या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेला निकाल रद्द करत संबंधित आरोपीला दिलासा दिला.

न्या. पंकज मिथल व न्या. उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. कर्नाटक उच्च न्यायालयाने एका २१ वर्षीय तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात कमरुद्दीन सनदी या आरोपीस दोषी ठरवले होते. माझ्या मुलीचे आरोपीशी आठ वर्षे प्रेमसंबंध होते. त्याने लग्नाचे वचन न पाळल्याने माझ्या मुलीने ऑगस्ट २००७ मध्ये आत्महत्या केली, अशी तक्रार या तरुणीच्या आईने केली होती. सनदीवर भादंविच्या कलम ४१७ (फसवणूक), ३०६ (आत्महत्येस कारण ठरणे) आणि ३७६ (बलात्कार) अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले होते.

सनदीला पाच वर्षांची शिक्षा व २५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला होता. सनदीने या शिक्षेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर झालेल्या सुनावणीअंती खंडपीठाने कर्नाटक उच्च न्यायालयाचा निकाल रद्द केला. हे संपुष्टात आलेल्या संबंधांचे प्रकरण असून, हा गुन्हेगारीविषयक खटला होऊ शकत नाही, असा निर्वाळा खंडपीठाने १७ पानी निकालात दिला. हा निर्णय देताना खंडपीठाने मृत तरुणीजवळ आढळलेल्या दोन चिठ्ठया विचारात घेतल्या. ‘या तरुणीने शारीरिक संबंधांविषयी काहीही भाष्य केलेले नाही. तसेच, आरोपीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचाही आरोप त्यात नाही असे खंडपीठाने नमूद केले.

मानसिक स्थितीवर अवलंबून
एखादी महिला क्रौर्याची बळी ठरली व त्यातून तिने आत्महत्येचे पाऊल उचलले तरी गृहकलह व मतभेद हे प्रकार आपल्या सामाजिक कौटुंबिक जीवनात नित्याचे आहेत आणि या प्रकारचे गुन्हे घडणे हे पीडितेच्या मानसिक स्थितीवर अवलंबून असते, असे न्यायालय नेहमीच मानते असेही या खंडपीठाने स्पष्ट केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news