उदगीर : बिभीषण मद्देवाड
आईच्या प्रेमाची व उपकाराची महती कितीही वर्णन केली तर ती संपत नाही . एका ६० वर्षीय आईने मुलीस किडनी दान देत पुनर्जन्म दिल्यामुळे आईच्या आफाट मातृत्व व वात्सल्याचा प्रत्यय आला आहे . नावंदी येथील आई धोंडाबाई अशोक हुजिरशिक्के यांनी मुलगी सौ रेखा हनुमंत लांडगे यांना किडनी देत पुनर्जन्म दिला आहे. धोंडाबाई व आशोक हुजिरशिक्के यांची मुलगी रेखा हनुमंत लांडगे यांचा विवाह बनवस तालुका पालम येथील हनुमंत लांडगे यांच्याशी झाला.रेखाबाई यांना १८ वर्षीय मुलगा आहे. रेखाबाई सासरी आनंदात जीवन व्यतीत करीत असताना गत दोन वर्षांपूर्वी त्यांच्या दोन्ही किडण्या काम करीत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान सुरेखा हनुमंत लांडगे यांच्यावर अनेक रुग्णालयातून किडनीच्या आजारासाठी उपचार घेतला परंतु दोन्ही किडनी निकामी झाल्याने त्यांची प्रकृती खालवत होती. आई धोंडाबाई यांनी आपल्या मुलीस स्वत:ची किडनी देण्याचा निश्चय केला. संभाजीनगर येथे एका रुग्णालयात दोघींच्या चाचण्या झाल्यानंतर त्यांनी मुलीस किडणी दिली आणि शस्त्रक्रिया यशस्वी झाली. आता आई आणि मुलीची प्रकृती चांगली आहे.