लातूर : प्रतिनिधी
इंडियन मेडीकल असोसिएशन (आयएमए) लातूर शाखेच्या मिशन पिंक हेल्थच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ‘आओ गाव चले हम’ अंतर्गत आरोग्य विषयक मार्गदर्शक कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मिशन पिंक हेल्थच्यावतीने सास्तुर येथील निवासी दिव्यांग शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यावेळी लातूर आयएमएच्या मिशन ंिपक हेल्थ ब्रँचने शाळेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.
डॉ. सुरेखा काळे यांनी यावेळी सोशल मीडियाची व्यसनाधीनता, गुड टच बॅड टच याबद्दल विद्यार्थ्याना समजेल अशा सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. मिशन ंिपक हेल्थच्या अध्यक्षा डॉ.वृंदा कुलकर्णी यांनी किशोरवयीन मुलांचे आरोग्य विषयक प्रश्न, त्याचे महत्त्व आणि रक्तक्षय व किशोरवयात घ्यावयाचा आहार याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आय एम ए ,लातूरचे अध्यक्ष डॉ. अनिल राठी,सचिव डॉ. आशिष चेपूरे,मिशन ंिपक हेल्थच्या स्टेट कोऑर्डिनेटर डॉ. सुरेखा काळे, अध्यक्ष डॉ.वृंदा कुलकर्णी, सचिव डॉ. रचना जाजू ,डॉ. मंगेश कुलकर्णी, दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक नादरगे यांसह अनेकांचे सहकार्य लाभले. या उपक्रमाद्वारे किशोरवयातील शारीरिक, मानसिक बदल,मासिक पाळी, स्वच्छता, रक्तक्षय व आहार,गुड टच बॅड टच,सोशल मिडिया व्यसनाधीनता, याबाबत सखोल माहिती मुलींना दिली जाते. अशाप्रकारे मिशन ंिपक हेल्थ व आय. एम. ए. किशोरवयीन मुलींच्या आरोग्य विषयक समस्या या अतिशय महत्त्वाच्या विषयावर उपक्रम राबवत आहे.