34.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रआकाशातून कोसळला ५० किलोचा धातूचा तुकडा

आकाशातून कोसळला ५० किलोचा धातूचा तुकडा

नागपूर : प्रतिनिधी
नागपूरमधील उमरेड तालुक्यात एक रहस्यमयी घटना घडली आहे. शहरातील कोसे ले-आउट परिसरात शनिवारी पहाटे ४च्या सुमारास अकाशातून धातूचा तुकडा घरावर कोसळला आहे. यामुळे घरातील रहिवाशांना लगेचच घराबाहेर धूम ठोकली. तर झालेल्या प्रकारामुळं परिसरात एकच खळबळ उडाली असून रहिवाशीदेखील घाबरले आहेत.

धातूचा तुकडा घरावर कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, मोठ्या स्फोटाचा आवाज आला आणि अकाशातून हा तुकडा घराच्या गच्चीवर पडवा. आवाज येताच घरातील सर्व लोक घाबरून घराबाहेर पडले. तर, घरावर धातूचा तुकड पडल्यानं छतावरील भिंतीचा भागही तुटला आहे. घरातील रहिवाशांनी घडलेल्या प्रकाराची पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचताच त्यांनी घराची आणि धातुच्या तुकड्याची पाहणी केली असता एक जाड लोखंडी तुकडा पत्रा अर्धवट तुटलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले.घराच्या स्लॅबवर हा तुकडा पडलेला होता. हा तुकडा नागपूर येथील फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून हा तुकडा नेमका कोणता आहे, याचा शोध घेतला जाणार आहे.

हा धातुचा तुकडा एखाद्या उपग्रहाचा भाग किंवा विमानाचा तुकडा असू शकतो, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घराच्या छतावर पडलेला तुकडा हा ५० किलो वजनाचा असून जवळपास चार फूट तर १० ते १२ एमएम जाडी आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, धातुचा तुकडा गरम होता. शिवाय छतावर तुकडा पडताच अवतीभवती जोरदार आवाज आला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR