23.4 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्रआगामी निवडणुका युद्ध, शस्त्रास्त्रासह सज्ज व्हा

आगामी निवडणुका युद्ध, शस्त्रास्त्रासह सज्ज व्हा

एकनाथ खडसे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
जळगाव : प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये अनपेक्षित निकाल लागल्यानंतर ईव्हीएमविरुद्ध विरोधकांनी आवाज उठवला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा विजय ईव्हीएमचा असून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणीदेखील केली तर दुसरीकडे महायुतीने तब्बल २३७ जागांवर स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर सरकार स्थापन करुन कामकाजही सुरू केले. विधानसभेच्या निवडणुकानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी पुढील दोन वर्षात राहिलेल्या सर्वच निवडणुका होणार असून या निवडणुका युद्ध आहेत, या युद्धासाठी शस्त्रसाठा गोळा करा, असे एकनाथ खडसे म्हणाले.

आगामी निवडणुका म्हणजे एक प्रकारचे युद्ध असणार आहे. या युद्धाच्या तयारीसाठी युद्धसामग्रीसह अस्त्र शस्त्राची आवश्यकता आहे, ते गोळा करा असे सूचक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या मेळाव्यात केले. मागील काळात विधानसभा निवडणुकीत यश मिळेल, असे वाटत असताना मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले. मात्र, जनतेचा कौल मान्य करुन नव्या जोमाने आगामी निवडणुकांसाठी सज्ज झाले पाहिजे. त्यासाठी मजबूत होणे गरजेचे आहे, कारण कमजोर माणसाला राजकारणात किंमत नाही. मजबूत माणसाला महत्व असल्याने मजबूत होणे गरजेचे असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

गिरीश महाजनांना टोला
पालकमंत्रीपदासाठी सरकारमधील काही मंत्र्यांचे वाद-विवाद असल्याचे सांगितले जात आहे. आपल्याला याच जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायचे आहे, असा हावरटपणा आणि आचरटपणा काही मंत्री करत आहेत. हाच जिल्हा पाहिजे, अशी मागणी करण्यामागे रहस्य दडले असल्याचे सांगत खडसेंनी नाव न घेता मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR