24.4 C
Latur
Wednesday, December 4, 2024
Homeलातूरआजपासून ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा

आजपासून ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी लातूरच्या मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात दि. ४ डिसेंबर ते १७ डिसेंबरपर्यंत होणार असून लातूरच्या नाट्य रसिकांना १३ दर्जेदार नाटकांची मेजवनी लाभणार आहे.
या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत दि. ४ डिसेंबर रोजी गुलाल, दि. ५ डिसेंबर रोजी आज महाराष्ट्र दीन आहे, दि. ६ डिसेंबर रोजी स्मशानयोगी, दि. ७ डिसेंबर रोजी परफेक्ट मिसमॅच, दि. ८ डिसेंबर रोजी कायनी दोस्त, दि. ९ डिसेंबर रोजी तु यावं., दि. १० डिसेंबर रोजी पुन्हा पुन्हा मोहोंजोदाडो, दि. ११ डिसेंबर रोजी सभ्य गृहस्थ हो, दि. १२ डिसेंबर रोजी मी कुमार, दि. १३ डिसेंब रोजी भोवरा, दि. १४ डिसेंबर रोजी खेळ, दि. १६ डिसेंबर रोजी गावगुंंड शेवटी झाला थंड, तर १७ डिसेंबर रोजी चाफा सुगंधी या बहरदार नाटकाचे सादरीकरण होणार आहे.  नाट्य रसिकांनी या नाट्य मेजवानीचा मोठ्या संख्येने उपस्थित राहून आस्वाद घ्यावा, असे आवाहन नाट्य स्पर्धेचे समन्वयक बाळकृष्ण धायगुडे यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR