लातूर : प्रतिनिधी
मानव विकास संस्थेच्या वतिने गहिनीनाथ महाराज यांच्या उपस्थितीत सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, खासदार डॉ. शिवाजीराव काळगे आणि माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील यांच्या हस्ते दि. १८ मे रोजी आजम शेख यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी जीवन विकास प्रतिष्ठान संचलित. सौ. सुशिलादेवी देशमुख निवासी मुलीचे मुकबधिर विद्यालय लातूर येथील शिक्षक भातखेडा सोसायटीचे व्हाईस चेअरमन आजम नवाजसाब शेख यांना दिव्यांगाचे शिक्षण, समस्या उपाय, सामाजिक योगदान, पुनर्वसन आदि कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व मित्रमंडाळीच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.