34.6 C
Latur
Monday, March 31, 2025
Homeलातूरआजोबांकडून तिघींवर लैंगिक अत्याचार

आजोबांकडून तिघींवर लैंगिक अत्याचार

लातूर : प्रतिनिधी

लातूरमध्ये ३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूरच्या देवणी तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. गावातील ५५ वर्षीय व्यक्तीने या तिन्ही मुलींना दुचाकीवर बसवून निर्जनस्थळी नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. घटनेची माहिती कोणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकी देखील दिली. या घटनेमुळे लातूरमध्ये खळबळ उडाली आहे. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली. गावामध्येच राहणा-या एका ५५ वर्षीय व्यक्तीने ३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केले. या तिन्ही मुली या व्यक्तीला आजोबा बोलतात. दुपारच्या सुमारास या व्यक्तीने या तिन्ही मुलींना दुचाकीवर बसवून शेतात नेले. त्याठिकाणी त्याने तिघींवर देखील लैंगिक अत्याचार केले. ओळखीची व्यक्ती असल्यामुळे या मुली आजोबासोबत गेल्या आणि त्यांच्यासोबत भयंकर घडलं.

लैंगिक अत्याचारानंतर आरोपीने मुलींना धमकी देखील दिली. याबाबतची माहिती घरी सांगितल्यास तुमचा जीव घेईल अशी धमकी आरोपी नराधमाने पीडित मुलींना दिली. मात्र घरी आल्यानंतर पीडित मुलींनी कुटुंबीयांना याबाबत सांगितले. तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी तात्काळ देवणी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या तक्रारीवरून देवणी पोलिसांनी ५५ वर्षीय व्यक्तीविरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR