27.9 C
Latur
Tuesday, May 6, 2025
Homeलातूरआज, उद्या, परवा वीजपुरवठा बंद  

आज, उद्या, परवा वीजपुरवठा बंद  

लातूर : प्रतिनिधी
शहरातील  उत्तर परिसरातील उच्चदाब वीजवाहिन्या बदलणे, उपकेंद्रामधील पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलणे व दुरुस्ती करण्याकरिता  दि. ६, दि. ७ मे व दि. ८ मे या दरम्यान टप्या-टप्याने ३३/११ केव्ही आर्वी, एमआयडीसी व जीआयएस उपकेंद्रातून वीजपुरवठा होणा-या वीजवाहिनीवरील परिसराचा वीजपुरवठा  सायंकाळी ५ ते ६.३०  दुस-या टप्प्यात ६.३० ते ८ तर तिस-या टप्प्यात रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहे. वीजग्राहकांनी सदरील दिवसाची व  वेळेची दखल घ्यावी असे महावितरणने कळवले आहे.
आज ३३ केव्ही आर्वी उपकेंद्रावरून वीजपुरवठा होणा-या साईबाबा वीजवाहिनीवरील धायगुडे नगर, सह्याद्री अपार्टमेंट, कृष्णाई अपार्टमेंट, दत्तसहवास सोसायटी परिसराचा वीजपुरवठा सायंकाळी ५ ते ६:३० वाजेपर्यंत बंद राहील. तसेच ३३ केव्ही एमआयडीसी उपकेंद्रावरील चैतन्य वीजवाहिनीवरील  बाईकाकाजी, मेरीडियन, येडेश्वरी, उदय सेल्स इत्यादी परिसराचा वीजपुरवठा सायंकाळी ५ ते ६:३० वाजेपर्यंत बंद राहील.  तसेच ३३ केव्ही जीआयएस उपकेंद्रावरील  सोनानगर वीजवाहिनीवरील सोना नगर, कोंबडे डी पी, कुलस्वामिनी नगर, शिवशंकर कॉलनी, विठ्ठल रुक्मिणी नगर, अवंती नगर, सय्यद नगर, मथुरांगण सोसायटी, निक्की बार मागील बाजूचा परिसर, साई शाळा जवळील एरिया, कृषिधन सोसायटी पांचाळ च्या शेता जवळील भाग, भगवान शाळेजवळील परिसर, कोर्ट कॉलनी, साने गुरुजी शाळा जवळील भागाचा वीजपुरवठा सायंकाळी ५ ते ६:३० वाजेपर्यंत बंद राहील.
दुस-या टप्प्यात ११ केव्ही शिवाजी चौक वीजवाहिनीवरील विशाल नगर श्याम नगर, बँक कॉलनी, समता सोसायटी, कैलास नगर, इदगाह मैदान भाग, उषाकिरण भाग, गगन विहार, श्याम नगर, साई मंदिर शेजारील भाग, बोधी चौक, विक्रम नगर, चवंडा हॉस्पिटल शेजारील भाग द्वारका नगरी, सुभाष नगर, चाणक्य नगर, अजंठा नगर, सचिदानंद नगर, पाण्याची टाकी बार्शी रोड, श्री नगर, बार्शी रोड, इत्यादी परिसराचा वीजपुरवठा सायंकाळी ६:३० ते रात्री ८ वाजेपर्यंत बंद राहील. तसेच एनदत्ता वीजवाहिनीवरील नवजीवन टायर्स भाग, स्वामी विवेकानंद कॉलेज भाग, गंगा पाईप्स भाग, लोकमत, ४ नं बस स्तोप भाग, पी. व्ही.आर भाग, एमआयडीसी उद्योग मित्र, ५ नं. पोलीस चौकी भाग इत्यादी परिसराचा वीजपुरवठा सायंकाळी ६:३० ते ८ वाजेपर्यंत बंद राहील. तसेच ११ केव्ही गंगासागर वीजवाहिनीवरील बुरहाण नगर, मालवती रोड, गंगासागर रेसिडेन्सी, शांताई मंगल कार्यालयाचा परिसर आदी भागाचा वीजपुरवठा सायंकाळी ६:३० ते रात्री ८ वाजेपर्यंत बंद राहीलमंदिर परिसर तसेच एमआयडीसी परिसराच्या भागातील वीजपुरवठा रविवारी सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहील. तसेच ११ केव्ही जुनी रेल्वे लाईन वीजवाहिनीवरील एस एम बार (मच्छी मार्केट) जवळ असलेल्या एबी स्विच पासून चालू होऊन पद्दीले डी पी, गिरवलकर नगर, वाल्मीक नगर आमलेस्वर नगर, पंचवटी नगर, चौधरी नगर, पठाण नगर, विकास नगर, न्यू भाग्यनगर, दयानंद कॉलेज, जी एस पाटील मळा, नरहरे डीटीसी, बुलढाणा डीटीसी वरील भागाचा वीजपुरवठा सायंकाळी ६:३० ते ८ वाजेपर्यंत बंद राहील.
तिस-या टप्प्यात ११ केव्ही स्वामीसमर्थ वीजवाहिनीवरील सोहेल नगर, सूळ नगर, केशव नगर, विक्रम नगर श्याम नगर, रामजी सुभेदार नगर, आग्रोया नगर, स्वामी समर्थ नगर, इंडिया नगर, एलआयसी ऑफिस परिसर तसेच ११ केव्ही द्वारका वीजवाहिनीवरील शारदा नगर, रेणुका नगर, व्यंकटेश नगर, गोरक्षण, मणियार नगर, टाके नगर, कल्पना नगर, कैलास नगर, जटाळ हॉस्पिटल भाग, श्रमसाफल्य सोसायटी, एसपी ऑफिस, मथुरा सोसायटी, संजय क्वालिटी भाग, केशवराज शाळा भाग, नवीन रेणापूर नाका ते शिवाजी चौक जाताना उजव्या हाताच्या भाग तसेच तंत्र निकेतन फीडरवरील जिजामाता शाळा परिसर, पवर पाठीमागील भाग, एमआयडीसी कॉलनी, एमआयडीसी भाग, हडको परिसर, आरती व मयूर डीपी, पतंजली जवळील भाग, महिला तंत्रनिकेतन कॉलेज त्याचबरोबर न्यू शासकीय फीडरच्या हडको कॉलोनी, शासकिय कॉलोनी, न्यू कलेक्टरऑफिस, इत्यादी परिसराचा वीजपुरवठा रात्री ८ ते ९:३० वाजेपर्यंत बंद राहील.
३३/११ केव्ही आर्वी उपकेंद्राच्या शारदा नगर फीडरवरील भिसेन नगर, रामचंद्र नगर, व्यंकटेश नगर, अजिंक्य सिटी, मा बाप कॉलनी, मयुरबन सोसायटी, मधुबन मैत्री पार्क, प्रयागबाई कॉलेज भाग, बालाजी मंदिर भाग, जुना रेणापूर नाका परिसराचा वीजपुरवठा रात्री ०९:३० ते ११वाजेपर्यंत बंद राहील. दि.६ मे ते ८ मेच्या दरम्यान टप्प्या टप्प्याने वीजपुरवठा बंद राहील वीजग्राहकांनी सदरील वेळेची दखल घेत सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. खंडीत वीजपुरवठयाबाबत सनियंत्रण कक्षाच्या ७८७५७६२०२१ या मोबाईल क्रमांकावर २४ तास तसेच १९१२, १८००२१२३४३५ व १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR