सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील मौजे निंबोणी येथील शेतकरी कामू पाटील यांच्या मृृृत्युप्रकरणातील आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी जनहीत संघटनेतर्फे मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यात येत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मौजे निंबोणी येथे 19 जानेवारी 2023 रोजी येथील शेतकरी कामु पाटील यांचा खुन झालेला असताना त्यांची दोन पाय आणि दोन हात तोडलेले असताना त्या घटनेबाबतचे सर्व पुरावे सोलापूर पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे यांच्याकडे व मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्याकडे खून झालेल्या कामु पाटील यांचे पुत्र रवींद्र पाटील यांनी दहा महिन्या पूर्वीच पुरावे दिलेले असताना कामु पाटील यांच्या खुनातील मारेकऱ्यांवर अद्याप 302 चा गुन्हा दाखल झालेला नाही याबाबत मुंबई आझाद मैदान येथे विविध प्रकारची चार आंदोलने महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख यांचे नेतृत्वाखाली कामु पाटील यांच्या कुटुंबाला घेऊन करण्यात आले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना प्रभाकर देशमुख म्हणाले वेळो वेळी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन राज्याचे पशु व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व गृहसचिव तसेच राज्याचे लोकायुक्त यांनी सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांना लेखी आदेश करून आठ दिवसात अहवाल सादर करा म्हणून पत्रे दिलेली असताना पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी चार ओळीचा अहवाल सादर केलेला नाही.
देशमुख पुढे बोलताना म्हणाले की रणजीत माने यांचेवर मंगळवेढा तालुक्यातल्या विविध घटनांबाबत खाते निहायचौकशी चालू असल्यामुळे त्यांची चार महिन्यापूर्वी बदली झालेली असताना परत सोलापूरचे एसपी यांनी त्यांना मंगळवेढ्याचा चार्ज कसा काय दिला? तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे यांनी स्वतः तपास अधिकारी असून स्वतःची जबाबदारी झटकून तपासात कुचराई केली.त्यामुळे त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात यावी यासाठी आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे .जोपर्यंत 302 चा संबंधितांवर गुन्हा दाखल होत नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे देशमुख यानी पत्रकारांशी बोलताना सांगितले यावेळी रवींद्र पाटील, त्यांच्या पत्नी पल्लवी पाटील ,मुलगा हर्षल पाटील उपोषणा मध्ये सहभागी आहेत